जाहिरात

Donald Trump : 'ते एकमेकांवर प्रेमही करत असतील, तिचे केस...' सुनीता विल्यम्सबद्दल ट्रम्प भलतंच बोलले!

Donald Trump : सुनीता आणि विल्मोर यांना परत आणण्यासाठी खास पथक पाठवण्याचे संकेत दिले आहेत. त्याचबरोबर या विषयावर बोलताना ट्रम्प यांनी भलतंच वक्तव्य केलं.

Donald Trump : 'ते एकमेकांवर प्रेमही करत असतील, तिचे केस...'  सुनीता विल्यम्सबद्दल ट्रम्प भलतंच बोलले!
मुंबई:

भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स (Sunita Williams) आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर (Butch Wilmore)  गेल्या कित्येक महिन्यांपासून अंतराळात अडकले आहेत. त्यांना परत पृथ्वीवर आणण्याचे प्रयत्न वेगानं केले जात आहेत. हे प्रयत्न सुरु असतानाच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donalad Trump) यांनी सुनीता विल्यम्ससाठी खास संदेश पाठवला आहे. 78 वर्षांच्या ट्रम्प यांनी या मेसेजमध्ये सुनीता यांच्या केसांची प्रशंसा केली आहे. त्याचबरोबर सुनीता आणि विल्मोर यांना परत आणण्यासाठी खास पथक पाठवण्याचे संकेत दिले आहेत. त्याचबरोबर या विषयावर बोलताना ट्रम्प यांनी भलतंच वक्तव्य केलं.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय म्हणाले ट्रम्प?

ट्रम्प यांनी सुनीता विल्यम्स यांचं मिशन लांबण्याबद्दल माजी अध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रशासनावर जोरदार टीका केली. ट्रम्प यांनी ओव्हल ऑफिसमधील मीडियाशी बोलताना सांगितलं की, बायडेन यांनी त्यांना तिथच सोडून दिलं होतं. आपले दोन अंतराळवीर अंतराळातच अडकले आहेत. मी एलना (मस्क) तू त्यांना बाहेर काढू शकतोस का? त्यानं उत्तर दिलं होय. आता तो त्याची तयारी करत आहेत. '

ट्रम्प यांना यावेळी सुनीता विल्यम्स यांच्या केसाची प्रशंसा करण्यापासून स्वत:ला रोखू शकले नाहीत. ते म्हणाले, मी त्या महिलेला पाहात आहे. तिचे केस खूप छान आणि दाट आहेत. ही थट्टा नाही. तिच्या केसांबाबत काही गंमत नाही.'

( नक्की वाचा : पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या नागरिकांना अमेरिकेत No Entry ! डोनाल्ड ट्रम्प का घेणार निर्णय? )

9 महिन्यांपासून अंतराळात

सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर गेल्या 9 महिन्यांपासून इंटरनॅशनल स्पेस स्टेशन सेंटरमध्ये अडकले आहेत. या दोघांना काय संदेश द्याल असा प्रश्न ट्रम्प यांना विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना ट्रम्प म्हणाले की, आम्ही त्यांच्यावर प्रेम करतो. आम्ही त्यांना घ्यायला येत आहोत. त्यांना इतका वेळ तिथं थांबायला नको होते. त्यांनी (जो बायडेन) तसं होऊ दिलं. पण, हा अध्यक्ष तसं करणार नाही. आम्ही त्यांना बाहेर काढू. आम्ही तुम्हाला घ्यायला येत आहोत.'

ते एकमेकांवर प्रेम...

यावेळी ट्रम्प यांनी अजब वक्तव्य केलं. ते म्हणाले की, 'मला आशा आहे की दोन्ही अंतराळवीर एकमेकांना आवडत असतील. कदाचित ते एकमेकांवर प्रेमही करतील. मला माहिती नाही. पण, त्यांना तिथं सोडून देण्यात आलं आहे. सध्या त्याचा विचार करा. तिथं धोका आहे. तिथं काहीही होऊ शकतं. ते खूप वाईट असेल. त्यांना बाहेर काढावं लागेल.'

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: