Elon Musk : एलॉन मस्क यांनी ट्रम्प यांची साथ सोडली? राजीनामा दिला ते 'DOGE' नेमकं काय आहे?

अब्जाधीश उद्योगपती एलॉन मस्क यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सर्वोच्च सल्लागार पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

अब्जाधीश उद्योगपती एलॉन मस्क यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सर्वोच्च सल्लागार पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. ट्रम्प सरकारमध्ये ते DOGE विभागाच्या प्रमुख पदावर होते. अमेरिकन नोकरशाहीमध्ये ऐतिहासिक सुधारणा घडवून आणण्याच्या उद्देशाने हा विभाग तयार करण्यात आला होता. हा विभागही आता बंद होणार की काय, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

दरम्यान DOGE चा राजीनामा दिल्यानंतर एलॉन मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांने आभार मानले. ते ज्या हेतूने येथे आले होते, त्याचा अवधी पूर्ण झाला आहे. सुरुवातीला मस्क यांनी या विभागाअंतर्गत सरकारी खर्चांमध्ये दोन ट्रिलियन डॉलरपर्यंत कपात करण्याची रणनीती तयार केली होती. मात्र राजीनामा देताना ते याबाबत काहीच म्हणाले नाही. 

Advertisement

नक्की वाचा - US Visa : भारतीय विद्यार्थी चिंतेत, ट्रम्प प्रशासनाकडून विद्यार्थ्यांच्या व्हिजा मुलाखतीवर बंदी

DOGE काय आहे?
DOGE म्हणजे Department of Government Efficiency. ही संकल्पना डोनाल्ड ट्रम्प यांनी आणली होती. याची जबाबदारी एलॉन मस्क आणि विवेक रामास्वामी यांच्यावर सोपविण्यात आली होती. योग्य पद्धतीने काम करण्यासाठी कमी माणसं किंवा लहान सरकार आवश्यक आहे. त्यातून वाया जाणारा खर्च कमी करता येऊ शकतो, असा त्यांचा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. DOGE च्या माध्यमातून अमेरिकेच्या बजेटमधून सुमारे  $6.75 ट्रिलियनची कपात करता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. DOGE एक अस्थायी विभाग आहे. याच्या माध्यमातून सरकारला बाहेरून सल्ला आणि मार्गदर्शन केलं जातं. मात्र हा विभाग कायद्यात बदल करू शकत नाही. 


 


Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world