Epstein Files: "जगातील श्रीमंत माणूस इतका कंजूस?" एपस्टीन फाइल्समध्ये बिल गेट्सबाबत धक्कादायक खुलासा

Epstein Files Leak: जेफ्री एपस्टीनने गेट्स यांचे सल्लागार बोरिस निकोलिक यांना लिहिलेल्या ईमेलमध्ये या नात्याचा उल्लेख करत बिल गेट्स यांच्यावर 'कंजूस' असल्याचा शिक्का मारला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Epstein Files: अमेरिकेतली जेफ्री एपस्टीन याच्याशी संबंधित गोपनीय फायलींमधून नवनवीन खुलासे होत आहेत.  यामध्ये आता मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांच्याबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. बिल गेट्स यांचे एका रशियन ब्रिज खेळाडूशी प्रेमसंबंध होते आणि तिच्या गरिबीच्या काळात गेट्स यांनी तिला कोणतीही मदत केली नव्हती, असा दावा एपस्टीनने एका ईमेलमध्ये केला आहे.

अमेरिकन न्याय विभागाने सार्वजनिक केलेल्या कागदपत्रांनुसार, बिल गेट्स यांचे रशियन ब्रिज खेळाडू मिला एंतोनोवा हिच्याशी 2010 च्या सुमारास प्रेमसंबंध होते. जेफ्री एपस्टीनने गेट्स यांचे सल्लागार बोरिस निकोलिक यांना लिहिलेल्या ईमेलमध्ये या नात्याचा उल्लेख करत गेट्स यांच्यावर 'कंजूस' असल्याचा शिक्का मारला आहे.

(नक्की वाचा-  Epstein Scandal ने खळबळ! नवीन 70 फोटोंमध्ये दिग्गज अडकले? महिलांच्या शरिरावरील ओळींचं 'लॉलिता' कनेक्शन)

"मित्राच्या सोफ्यावर झोपायची वेळ"

एपस्टीनने आपल्या ईमेलमध्ये दावा केला आहे की, मिला एंतोनोवा हिची आर्थिक स्थिती इतकी खालावली होती की तिच्याकडे एअर कंडिशन खरेदी करण्यासाठी किंवा ब्रिज स्पर्धेसाठी प्रवास करण्यासाठीही पैसे नव्हते. ती एका मित्राच्या घरी सोफ्यावर झोपून दिवस काढत होती. एपस्टीनने लिहिले, "तुझा मित्र बिल वेडा आहे. त्याची जुनी मैत्रीण इतकी गरीब आहे आणि जगातील सर्वात श्रीमंत माणूस तिला मदत करत नाही."

53 वर्षांचे गेट्स आणि 20 वर्षांची मिला

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बिल गेट्स आणि मिला यांची पहिली भेट 2009 मध्ये एका ब्रिज स्पर्धेदरम्यान झाली होती. त्यावेळी गेट्स 53 वर्षांचे होते, तर मिला त्यांच्यापेक्षा 30 वर्षांनी लहान होती. विशेष म्हणजे, ज्या काळात हे कथित संबंध होते, त्यावेळेस बिल गेट्स यांचे मेलिंडा गेट्स यांच्याशी लग्न झालेले होते. लाईव्ह हिंदुस्थानने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

Advertisement

(नक्की वाचा-  Epstein Files :जग हादरलं! स्विमिंग पुलमध्ये मुलींसोबत अंघोळ करतानाचे फोटो; एपस्टिन फाइल्समधून मोठी माहिती समोर)

ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न?

असे म्हटले जाते की, 2017 मध्ये एपस्टीनने मिलाच्या शिक्षणासाठी खर्च केलेले पैसे बिल गेट्स यांच्याकडे मागितले होते. हा एक प्रकारे गेट्स यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न होता, जेणेकरून त्यांनी एपस्टीनच्या नवीन चॅरिटेबल फंडमध्ये गुंतवणूक करावी. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना बिल गेट्स यांनी मान्य केले आहे की, एपस्टीनला भेटणे ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती आणि त्यांना त्या प्रत्येक भेटीचा पश्चाताप आहे.