इस्रायलने हमासनंतर आपला मोर्चा हिजबुल्लाहकडे वळवला आहे. इस्त्रायल आणि लेबनॉनमधला संघर्ष आता तीव्र झाला आहे. लेबनॉनच्या पूर्व आणि दक्षिण भागात इस्त्रायलने क्षेपणास्त्रांचा मारा केला आहे. त्यात 492 जणांचा मृत्यू झाला तर 1600 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 35 मुलांचा आणि 58 महिलांचा समावेश आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
त्याआधी लेबनानने इस्त्रायलवर रॉकेटसचा हल्ला केला होता. त्यात कुठल्याही हाणीचे वृत्त नाही. पण इस्त्रायलने आठवड्याभरासाठी इमर्जन्सी जाहीर केली आहे. गेल्या आठवड्यात इस्त्रायलने लेबनॉनमध्ये पेजर हल्ले घडवल्यानंतर दोन्ही देशातली स्थिती नाजूक बनली आहे. दोन्ही देश एकमेकांवर जोरदार हल्ले करत आहेत. त्यात लेबनॉनचे जास्त नुकसान होताना दिसत आहे.
(नक्की वाचा- लेबनानमधील पेजर स्फोटाचं केरळ कनेक्शन ? वायनाडमधील तरुणाचा शोध सुरु)
इस्त्रायलच्या हल्ल्याचा परिणाम म्हणून हजारो लेबनीज नागरिकांना स्थलांतर करावं लागलंय. ते सर्वजण राजधानी बैरुतकडे निघाले आहेत. त्यामुळे 2006 च्या इस्त्रायल-हिजबुल्लाहच्या युद्धानंतरचं हे सर्वात मोठं स्थलांतर मानलं जात आहे.
इस्त्रायली सैन्याने हल्ल्याबाबत माहिती देताना म्हटलं की, हल्ले दक्षिण लेबनॉन आणि बेका व्हॅलीमध्ये करण्यात आले आहेत. आयडीएफच्या फायटर जेट्सनी हिजबुल्लाहशी संबंधित दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला. हे ऑपरेशन गुप्तचर विभाग आणि हवाई दलाच्या पूर्ण समन्वयाने करण्यात आले.
( नक्की वाचा : खोटी कंपनी बनवली आणि 'पप्पू' पेजरला बॉम्ब बनवण्यासाठी इस्रायलनं वापरलं असं डोकं की...)
इस्रायली हवाई हल्ले बिंट जबेल, अतारोन, मजदल सालेम, हौला, तोरा, कालालेह, हरिस, नबी चित, तरैया, श्मेस्टार, हरबता, लिब्बाया आणि सोहमोर यासह डझनभर शहरांवर झाले. लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्र समन्वयक यांनी संगितलं की, राजनैतिक प्रयत्नांना यश मिळण्यासाठी वेळ दिला पाहिजे. कारण दोन्ही बाजूंच्या नागरिकांची सुरक्षा आणि प्रदेशाची स्थिरता धोक्यात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world