जाहिरात

नरसंहारातील अज्ञातांची ओळख पटविण्यासाठी AI चा वापर करणार 

एआयच्या मदतीने तयार करण्यात आलेल्या तंत्रज्ञानाच्या मदतीने इंग्रजी, हिब्रू, जर्मनी, रशियन आणि इतर भाषांमधील कागदपत्रे, पुरावे पडताळले जातील. 

नरसंहारातील अज्ञातांची ओळख पटविण्यासाठी AI चा वापर करणार 

जर्मनीचा कुख्यात हुकूमशहा अडॉल्फ हिटलर याने ज्यूंचा नरसंहार केला होता. नरसंहारात बळी पडणाऱ्यांमध्ये अनेकजण असे आहेत ज्यांची नावेही आजपर्यंत कळू शकलेली नाही. अशा व्यक्तींची ओळख पटावी, त्यांची नावे कळावीत यासाठी कृत्रिम बुद्धीमत्ता अर्थात (artificial intelligence) चा वापर करण्यात येणार आहे. हिटलरच्या आदेशावरून जर्मन सैनिकांनी जवळपास ६० लाख ज्यूंचा नरसंहार केला होता. ६ मे रोजी याद वाशेम ही संस्था नरसंहार आठवण दिवस म्हणून पाळते. या दिवशी नरसंहारात बळी पडलेल्या ज्ञात-अज्ञात ज्यूंची आठवण काढली जाते आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली जाते. या दिनाच्या निमित्ताने याद वाशेन संस्थेने कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारीत एक तंत्रज्ञान विकसित केले असून त्याद्वारे ज्ञात -अज्ञात पीडितांची माहिती जमा केली जात असल्याचे सांगितले. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

गेल्या अनेक वर्षांच्या अथक मेहनतीनंतर अभ्यासकांनी ४० लाख ९० हजार पीडितांची ओळख पटवली आहे. या पीडितांचे जबाब, कागदपत्रे, जुनी चलचित्रे, थडगी आणि अन्य कागदपत्रे तपासल्यानंतर ही ओळख पटवण्यात यश आले होते. या वाशेममध्ये सॉफ्टवेअर विकसित करणाऱ्या एस्थर फक्सब्रुमर यांनी म्हटले की,"सगळी माहिती तपासणे, एकही बाब नजरेतून निसटू न देणे हे मानवाला शक्य होत नाही ९० लाख दस्तावेजात अनेक त्रुटी आहेत. नाझींनी ज्यूंना पकडले, त्यांना गोळ्या घातल्या आणि पुरून टाकले. त्यांच्याबद्दल सांगणारे आज कोणीही हयात नाही."

प्रत्येक पीडिताची तारीख, त्याचे कुटुंबीययांचा तपशील जमा करणे, पडताळणे त्या कागदपत्रांची, पुराव्यांची नक्कल पुन्हा तपासली जाण्याची भीती हे सगळं अशक्य कोटीतील गोष्ट आहे. एआयच्या मदतीने तयार करण्यात आलेल्या तंत्रज्ञानाच्या मदतीने इंग्रजी, हिब्रू, जर्मनी, रशियन आणि इतर भाषांमधील कागदपत्रे, पुरावे पडताळले जातील. सध्या या तंत्रज्ञानाची चाचणी सुरू आहे. या तंत्रज्ञानामुळे वेळेची बचत होते. असंख्य कागदपत्रे क्षणात पडताळली जातात आणि यातून मिळणारे निष्कर्ष हे अचूक असतात. 

( नक्की वाचा : 'हिंदू मुली हा लुटीचा माल नाही', पाकिस्तानच्या खासदारानं सरकारला सुनावलं, Video )

प्रत्येक जबाबातून ६ ते ७ नावे आणि त्यांचा सगळा तपशील मिळतो आणि तो आपोआप माहिती संचयात समाविष्ट होतो. आतापर्यंतच्या माहिती संचयात फक्त १० टक्के नावे ही पूर्वीपासून आमच्या संचयात होती असे दिसून आले आहे. ९० टक्के नावे ही आम्हाला माहितीही नव्हती असे सॉफ्टवेअर विकसित करणाऱ्या एस्थर फक्सब्रुमर यांनी सांगितले. त्यांनी पुढे म्हटले की,"आम्हाला येहुदीत आणि रुथ रोझेनबॉम यांची माहिती मिळाली. साडेचार वर्षांचे हे बहीण भाऊ जुळे होते.रोमानियातील या चिमुकल्यांना ऑशवित्झला नेण्यात आले होते. यातल्या येहुदीतचे प्राण वाचले मात्र रुथची हत्या करण्यात आली होती. रुथबद्दल आम्हाला तिच्या कुटुंबातील व्यक्तींकडून नाही तर तिच्यासोबत ऑशवित्झमध्ये असलेल्या इतरांकडून माहिती मिळण्यास मदत झाली." सॉफ्टवेअरच्या चाचणीमध्ये ३० हजार जबाबांपैकी ४०० जबाब वापरून चाचणी घेण्यात येत आहे. यात नरसंहारातूबन बचावलेल्यांचे ३ तासांचे दीर्घ व्हिडीओ देखील समाविष्ट आहेत. 

(नक्की वाचा- कझाकिस्तानच्या माजी मंत्र्याने पत्नीची क्रूरपणे मारहाण करत केली हत्या; संतापजनक CCTV फुटेज समोर)

फक्सब्रुमर यांनी सांगितले की या सॉफ्टवेअरमुळे १५०० नवी नावे उजेडात येण्यास मदत झाली आहे. येत्या काळात आणखी काही नावे उजेडात येतील. सॉफ्टवेअर सगळ्या ३० हजार जबाब,जबान्या आणि पुरावे तपासेल तेव्हा नवी माहिती उजेडात येईल.  त्यापुढच्या टप्प्यात रोजनिशीतील माहिती खंगाळली जाईल. या सॉफ्टवेअरमुळे क्रूरपणे ठार मारण्यात आलेल्यांच्या, आजपर्यंत जगाला कधीही कळाल्या नव्हत्या अशा सत्यघटना कळतील. यामुळे त्यांच्यासोबत काय झालं होतं हे कळण्यास मदत होईल.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Previous Article
India - Canada : कॅनडाच्या पंतप्रधानांच्या मनात भारताबाबत इतकं विष का आहे? समजून घ्या खरं कारण
नरसंहारातील अज्ञातांची ओळख पटविण्यासाठी AI चा वापर करणार 
Colonel Vaibhav Kale originally from Nagpur martyred in Gaza attack
Next Article
मूळचे नागपूरचे कर्नल वैभव काळे यांना गाझातील हल्ल्यात वीरमरण