जाहिरात
Story ProgressBack

कझाकिस्तानच्या माजी मंत्र्याने पत्नीची क्रूरपणे मारहाण करत केली हत्या; संतापजनक CCTV फुटेज समोर

साल्टानॅट यांचा मृत्यू मेंदूला इजा झाल्याने झाल्याचं वेद्यकीय अहवालातून समोर आलं. त्याच्या नाकाचं हाड देखील तुटलं होतं. चेहरा, डोकं, छाती आणि हातावर गंभीर जखमा देखील आढळल्या. 

Read Time: 2 mins
कझाकिस्तानच्या माजी मंत्र्याने पत्नीची क्रूरपणे मारहाण करत केली हत्या; संतापजनक CCTV फुटेज समोर

कझाकिस्तान सरकारमधील माजी मंत्र्यांने पत्नीची बेदम मारहाण करुन हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे कझाकिस्तानचे राष्ट्रपती कासिम जोमार्ट टोकायव हे देखील अडचणीत आले आहे. माजी अर्थमंत्री कुआंडिक विशिम्बायेव यांची पत्नी साल्टानॅट नुकेनोवा त्यांच्याच एका नातेवाईकाच्या हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळल्या होत्या. नोव्हेंबर 2023 मधील ही घटना आहे. याठिकाणी पती-पत्नी दोघेही संपूर्ण दिवस वास्तव्याला होते. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

हत्येच्या घटनेनंतर आरोपी पतीला अटक करण्यात आली असून न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीत 8 तासांचं सीसीटीव्ही फुटेज दाखवण्यात आलं. यामध्ये बिशिम्बायेव हे पत्नी नुकेनोवा हिला अमानुषपणे मारहाण करताना दिसत आहेत. व्हिडीओतील दृष्यांनुसार, बिशिम्बायेव पत्नीला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत आहेत. केस ओढून फरपटत आहेत. 

साल्टानॅट यांनी शौचालयात लपून बसून स्वत:चा बचाव करण्याचाही प्रयत्न केला. मात्र बिशिम्बायेव यांनी दरवाजा तोडून त्यांना बाहेर काढलं आणि पुन्हा बेदम मारहाण केली. शौचालयातून बाहेर आल्यानंतर त्यांनी साल्टानॅट यांचा गळा आवळला. त्यानंतर त्या बेशुद्ध झाल्या. 

(VIDEO- सुषमा अंधारे यांचं हेलिकॉप्टर क्रॅश, पाहा व्हिडीओ)

साल्टानॅट जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडल्या असताना देखील बिशिम्बायेव यांना पाझर फुटला नाही. साल्टानॅट यांना जखमी अवस्थेत सोडून ते निघून गेले. तब्बल 12 तासांना त्यांना वैद्यकीय मदत मिळाली. पण ज्याची भीती होती तेच झालं. साल्टानॅट यांचा मृत्यू झाला. 

(नक्की वाचा - आमदार किरण सरनाईक कुटुंबीयांच्या कारला अपघात 4 जणांचा मृत्यू)

वैद्यकीय अहवालात काय आलं समोर?

साल्टानॅट यांचा मृत्यू मेंदूला इजा झाल्याने झाल्याचं वेद्यकीय अहवालातून समोर आलं. त्याच्या नाकाचं हाड देखील तुटलं होतं. चेहरा, डोकं, छाती आणि हातावर गंभीर जखमा देखील आढळल्या. 

पोलिसांनी आरोपी बिशिम्बायेव यांना अटक केली असून न्यायालयात सध्या सुनावणी सुरु आहे. बिशिम्बायेव यांना याप्रकरणी 20 वर्षांची शिक्षा होऊ शकते. सोशल मीडियावर या प्रकरणी आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
'हिंदू मुली हा लुटीचा माल नाही', पाकिस्तानच्या खासदारानं सरकारला सुनावलं, Video
कझाकिस्तानच्या माजी मंत्र्याने पत्नीची क्रूरपणे मारहाण करत केली हत्या; संतापजनक CCTV फुटेज समोर
Veteran Russian chess player Garry Kasparov gave clarification after the post on Rahul Gandhi viral
Next Article
'रायबरेलीतून जिंकावं लागतं' बुद्धिबळाच्या राजानं 'त्या' पोस्टवर दिलं स्पष्टीकरण
;