
Hormuz island red beach : आपण पूर पाहिला असेल, मुसळधार पाऊसही पाहिला असेल, पण लाल भडक पुराचं पाणी कधी पाहिलं आहे का? इराणच्या होर्मुझ बेटावर (Hormuz island) पाऊस पडल्यानंतर आलेल्या पुराची जगभरात चर्चा असते. त्यामागील कारणही तसंच आहे. या होर्मुझ बेटावर पूराचा रंग हा लालभडक आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या बेटावर मुसळधार पाऊस झाल्यानंतर इथं अनेकदा असा लाल मातीचा (red beach) पूर येतो आणि त्यानंतर ते पाणी समुद्राला मिळतं. लाल रंगाच्या मातीचा थर एवढा जाड असतो की, समुद्रात हे पाणी मिसळल्यानंतर तिथेही लाल रंगाचा समुद्र तयार होतो. पुराच्या पाण्याला लाल भडक मातीचा रंग लागल्याचं पाहायला मिळतं. पर्शियन आखातातलं हे बेट अनेक खनिजांनीयुक्त आहे. इथं जवळपास 70 खनिजं आहेत. त्यांच्या थरांनीच होर्मुझ हे बेट बनलेलं आहे. त्यामुळे येथील माती लाल रंगीची परिणामी पाणीही लालभडक असल्याचं पाहायला मिळतं. हे बेट इंद्रधनुषी बेट म्हणूनही ओळखलं जातं, कारण इथं कायम इंद्रधनुष्य तयार होत असतात.
होर्मुरचं बेट दिसायला अत्यंत सुंदर असल्यामुळे येथे मोठ्या संख्येने पर्यटक भेट देत असतात. बेटावरील पाणी गरम असतं. या बेटावरील माती खाण्यासाठी वापरली जात असल्याचं म्हटलं जातं. स्थानिक लोक त्यांच्या जेवणात मीठ आणि मसाल्यांऐवजी या जागेवरील मातीचा वापर करतात अशी माहिती आहे. होर्मुझ बेटाच्या वाळूमध्ये लोह आणि सोडियम आढळतं. याशिवाय या मातीत ७० विविध प्रकारची खनिजं आढळतात. ही खनिजं आरोग्यासाठीही फायदेशीर आहेत. येथील मातीचा वापर करीत स्थानिक एक विशिष्ट प्रकारची भाकरीदेखील तयार करतात.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world