जाहिरात

Khamenei Death: डेंटिस्ट बनून आले अन् खामेनींना संपवून गेले! मोसादच्या ऑपरेशनचा थरार वाचून डोकं चक्रावेल

Mossad Operation Tooth Fairy: इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांचा खात्मा झाल्याच्या बातमीने सध्या संपूर्ण जग हादरून गेले आहे.

Khamenei Death: डेंटिस्ट बनून आले अन् खामेनींना संपवून गेले! मोसादच्या ऑपरेशनचा थरार वाचून डोकं चक्रावेल
Ayatollah Khamenei : मोसादने वापरलेली एक धक्कादायक आणि डोकं चक्रावून टाकणारी रणनीती समोर येत आहे.
मुंबई:


Mossad Operation Tooth Fairy: इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांचा खात्मा झाल्याच्या बातमीने सध्या संपूर्ण जग हादरून गेले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः याबाबतची घोषणा केली. त्यानंतर इराणनंही खामेनी यांचा मृत्यू झाल्याचं मान्य करत 40 दिवसांचा दुखवटा जाहीर केला. खामेनी यांच्या खात्म्यानंतर  पुआता एकच प्रश्न विचारला जात आहे की, इतक्या कडक सुरक्षेत राहणाऱ्या खामेनी यांच्यापर्यंत इस्रायल आणि अमेरिका पोहोचले तरी कसे? यामागे इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादने वापरलेली एक धक्कादायक आणि डोकं चक्रावून टाकणारी रणनीती समोर येत आहे.

दातांमधील चिप आणि मोसादचा चक्रव्यूह

खामेनी यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. यामध्ये सर्वात जास्त चर्चा होत आहे ती म्हणजे डेंटल इम्प्लांट थ्योरीची. या दाव्यानुसार, मोसादच्या एजंटनी डॉक्टर आणि डेंटिस्टचे रूप घेऊन इराणमध्ये प्रवेश केला होता. गेल्या काही वर्षांत हे अंडरकवर एजंट इराणच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या संपर्कात आले. 

उपचाराच्या बहाण्याने त्यांनी इराणच्या वरिष्ठ नेत्यांच्या किंवा त्यांच्या जवळच्या व्यक्तींच्या दातांमध्ये एक सूक्ष्म ट्रॅकिंग चिप बसवली. या एका छोट्याशा चिपमुळे खामेनी नक्की कुठे आहेत आणि त्यांची हालचाल कशी सुरू आहे, याची अचूक माहिती थेट इस्रायल आणि अमेरिकेपर्यंत पोहोचत होती.


( नक्की वाचा : Mumbai to Dubai :समोरून येत होते क्षेपणास्त्र! मुंबई-दुबई विमानाचा हवेतच थरारक यु-टर्न; पाहा काय घडलं? )
 

इराणला मोठा धक्का

रोजी अमेरिका आणि इस्रायलने मिळून 28 फेब्रुवारी रोजी एका मोठ्या जॉइंट ऑपरेशनला सुरुवात केली. इराणला अण्वस्त्रे मिळवण्यापासून रोखण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे ट्रम्प आणि बेंजामिन नेतन्याहू यांनी स्पष्ट केले आहे. या मोहिमेदरम्यान इराणवर भीषण हवाई हल्ले करण्यात आले. 

अमेरिकेने खामेनी यांच्या लोकेशनचा अचूक मागोवा घेतला आणि त्यांना कंठस्नान घातले. इराणच्या नागरिकांसाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे, कारण खामेनी यांची सुरक्षा भेदणे अशक्य मानले जात होते.

( नक्की वाचा : 'ना पाणी, ना जेवण... मी मॉस्को विमानतळावर भिकाऱ्यासारखा उभा आहे!'; मुंबईकर तरुणाची मदतीसाठी आर्त हाक )
 

जगभरात चर्चांना उधाण

डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ सोशल या प्लॅटफॉर्मवरून खामेनी यांच्या मृत्यूची अधिकृत घोषणा केली. त्यानंतर जगभरात कॉन्स्पिरसी थ्योरीजचा पूर आला आहे. कुणी याला मोसादचे टूथ फेअरी ऑपरेशन म्हणत आहे, तर कुणी इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्समध्येच कोणीतरी फितूर असल्याचे सांगत आहे. दुसरीकडे, खामेनी यांच्या समर्थकांचा असा दावा आहे की, स्वतःच्या जीवाला धोका असल्याचे माहित असूनही त्यांनी बंकरमध्ये जाण्यास नकार दिला होता.

मोसादचे गुप्त ऑपरेशन आणि अंडरकव्हर डॉक्टर्स

एक्स या प्लॅटफॉर्मवर एका युजरने असा दावा केला आहे की, मोसादचे एजंट अनेक वर्षांपासून इराणमध्ये डॉक्टर म्हणून वावरत होते. इराणच्या सत्ताकेंद्रातील महत्त्वाच्या व्यक्तींवर उपचार करताना त्यांनी ही ट्रॅकिंग यंत्रणा कार्यान्वित केली. यामुळे केवळ खामेनीच नाही, तर त्यांच्या कुटुंबाच्या हालचालींवरही इस्रायलची नजर होती. जरी या माहितीला अधिकृत दुजोरा मिळालेला नसला, तरी इस्रायलच्या तंत्रज्ञानाची आणि मोसादच्या कामाच्या पद्धतीची जगभरात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com