
हेमाली मोहिते, प्रतिनिधी
रोमन कॅथलिक ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांच्यावर आज (26 एप्रिल 2025) अंत्यसंस्कार करण्यात आले. ते 88 वर्षांचे होते. ते लॅटिन अमेरिकन कॅथलिक पोप होते. त्यांच्या निधनानंतर नवे पोप कोण असणार? याची चर्चा सुरु झाली आहे. नव्या पोपची निवड करण्याची प्रक्रिया अतिशय गुंतागुतींची आहे. या सर्व पद्धतीवर आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत.
पोप म्हणजे रोमचे बिशप अर्थात रोमन कॅथलिक चर्चचे सर्वोच्च धर्मगुरू... व्हॅटिकन सिटीमध्ये त्यांचं वास्तव्य असतं. 2013 मध्ये पोपपदी निवड झालेल्या पोप फ्रान्सिस यांचं वयाच्या 88 व्या वर्षी निधन झालं. आता पुढील 15 ते 20 दिवसांमध्ये रोमन कॅथलिक चर्चला नव्या पोपची नियुक्ती करावी लागणार आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नव्या पोपची निवड कोण करतात?
नवीन पोप निवडण्याची परंपरा सुमारे 700 वर्ष जुनी प्रक्रिया आहे. व्हॅटिकनमधील सिस्टीन चॅपलमध्ये ही प्रक्रिया पार पडते. या प्रक्रियेला कॉन्क्लेव्ह म्हटलं जातं. पोपच्या निवडीसाठी जगभरातील कार्डिनल मतदान करतात.जगभरात एकूण 252 कार्डिनल आहेत. त्यापैकी फक्त 138 कार्डिनल नवीन पोप निवडीसाठी मतदान करू शकतात. त्यातही 80 वर्षांपेक्षा कमी वयाच्या कार्डिनल्सना मतदानाचा हक्क असतो. या नियमांनुसार 80 वर्षांपेक्षा कमी वयाचे 115 कार्डिनल मतदान करतील.
ही निवडणूक प्रक्रिया अत्यंत गुप्तपणे पार पाडली जाते. सर्व कार्डिनल्सना चॅपलमध्ये बंद केलं जातं. चॅपल सिलबंद करतात. त्यांना सोबत मोबाईल ठेवण्याचीही परवानगी नसते. नवीन पोपची निवड झाल्यानंतरच सर्व चॅपलमधून बाहेर पडतात. ही प्रक्रिया अनेक दिवस चालू राहू शकते.
( नक्की वाचा : Pope Francis : पोप फ्रान्सिस यांचं वयाच्या 88 व्या वर्षी निधन, व्हॅटिकन सिटीमध्ये घेतला अखेरचा श्वास )
काळा आणि पांढरा धूर
निवडणुकीत गुप्त मतदानाद्वारे कागदी मतपत्रिकांद्वारे मतदान केले जाते. कोणत्याही कार्डिनलला दोन-तृतीयांश मतं मिळेपर्यंत मतदान होतं. कोणत्याही कार्डिनलला 77 कार्डिनलची मतं मिळत नाहीत तोपर्यंत निवडप्रक्रिया सुरुच राहते. प्रत्येक टप्प्यातील मतदानानंतर बॅलेट पेपर्समध्ये एक खास केमिकल टाकून ते जाळले जातात. चिमणीतून काळा धूर निघाला म्हणजे निवड प्रक्रिया अजून सुरू असल्याचं समजतं. तर, पोपची निवड झाल्यानंतर मतपत्रिकांना दुसऱ्या खास केमिकलने जाळलं जातं, यावेळी चिमणीतून पांढरा धूर निघतो. हा व्हॅटिकनबाहेर जमलेल्यांसाठी हा एक संदेश असतो.
पोप निवडल्यानंतर कार्डिनल स्वतःसाठी एका नवीन नावाची निवड करतात. यानंतर 'नवीन पोपची घोषणा होते नवीन पोप पोषाख घालून बॅसिलिकाच्या बाल्कनीमध्ये येतात. तिथं त्यांची पोप म्हणून पहिली झलक पाहण्यासाठी भाविक जमलेले असतात. पोप त्यांचं अभिवादन स्वीकारतात.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world