जाहिरात

Pope Francis : पोप फ्रान्सिस यांचं वयाच्या 88 व्या वर्षी निधन, व्हेटिकन सिटीमध्ये घेतला अखेरचा श्वास

सोमवारी व्हेटिकन चर्चकडून याबाबत माहिती देण्यात आली. पोप फ्रान्सिस यांनी वयाच्या 88 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. 

Pope Francis : पोप फ्रान्सिस यांचं वयाच्या 88 व्या वर्षी निधन, व्हेटिकन सिटीमध्ये घेतला अखेरचा श्वास

Pope Francis died : पोप फ्रान्सिस यांचं सोमवारी व्हेटिकन सिटीमध्ये निधन झालं. गेल्या बऱ्याच दिवसांपासून ते आजारी होते. सोमवारी व्हेटिकन चर्चकडून व्हिडिओ स्टेटमेंटमधून याबाबत माहिती देण्यात आली. पोप फ्रान्सिस यांनी वयाच्या 88 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. 

मिळालेल्या माहितीनुसार, पोप फ्रान्सिस यांना दहा दिवसांपूर्वी रोममधील जेमेली रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना फुप्फुसाच्या गुंतागुंतीच्या संसर्गाने ग्रासले होते. ज्यामुळे त्यांना मूत्रपिंड निकामी होण्याचे सुरुवातीचे टप्पे देखील दिसू लागले होते. यापूर्वी 2021 मध्ये ते रोममधील याच जेमेली रुग्णालयात दहा दिवसांपर्यंत दाखल होते.  

बातमी अपडेट होत आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com