
Parle G Biscuit Price Viral Post: पार्ले-जी बिस्किट म्हटलं की बालपणीचे दिवस आठवतात. बालपणीचा सर्वात आवडता अन् खास खाऊ म्हणजे हे बिस्कीट. लहानपणी आवडीने पार्ले जी बिस्कीट खाणारे खवय्यै आता मोठे झाले, काळ बदलला, आवडी बदलल्या पण या बिस्कीटाची चव अन् किंमत आजही तितकीच आहे. अवघ्या पाच रुपयात मिळणारे हे बिस्कीट भारतातील आजही सर्वाधिक खप होणारे बिस्कीट आहे. मात्र भारतात स्वस्तात मिळणारे हे बिस्किट उपासमारीशी झुंजणाऱ्या गाझामध्ये 500 पट जास्त किमतीत विकले जात असल्याचे समोर आले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
इस्रायलने उद्ध्वस्त केलेल्या गाझामध्ये आजकाल अन्नाची तीव्र टंचाई आहे. लोक प्रत्येक अन्न धान्यासाठी संघर्ष करत आहे. इतर देश गाझाला मदत पाठवत आहेत. अशातच गाझामधील एक पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये एका व्यक्तीने असा दावा केला आहे की गाझामध्ये पार्ले-जी बिस्किट 24 युरो (2,342 रुपये) पेक्षा जास्त किमतीत विकले जात आहेत. बिस्किटांची ही किंमत पाहून सोशल मीडियावर अनेक लोक आश्चर्यचकित झाले.
After a long wait, I finally got Ravif her favorite biscuits today. Even though the price jumped from €1.5 to over €24, I just couldn't deny Rafif her favorite treat. pic.twitter.com/O1dbfWHVTF
— Mohammed jawad 🇵🇸 (@Mo7ammed_jawad6) June 1, 2025
व्हायरल पोस्टमध्ये लिहिले आहे की, "बऱ्याच प्रतीक्षेनंतर, आज मला अखेर रविफचे आवडते बिस्किट मिळाले. पण किंमत 1.5 युरोवरून 24 युरो झाली, परंतु मी रविफला त्याचे आवडते बिस्किट देण्यास नकार देऊ शकलो नाही. या व्हायरल पोस्टवर नेटकऱ्यांनी भरभरुन प्रतिक्रिया दिल्यात. ज्यामध्ये त्यांनी युद्ध कधीही कुणासाठीही चांगले नसते हरलो तरी आणि जिंकलो तरी, अशी भावूक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
नक्की वाचा - UP News: रीलने केला घात! एकाच घरातील 6 मुली बुडाल्या, चौघींचा मृत्यू, गावावर शोककळा
ऑक्टोबर 2023 पासून गाझामध्ये वस्तू महाग झाल्या आहेत. इस्रायली हल्ल्यांनंतर गाझामध्ये अन्नाची कमतरता आहे. अन्नपदार्थ गाझापर्यंत योग्यरित्या पोहोचू शकत नाहीत. या वर्षी 2 मार्च ते 19 मे दरम्यान, या पॅलेस्टिनी भागाला जवळजवळ संपूर्ण नाकेबंदीचा सामना करावा लागला. मर्यादित संख्येने मानवीय ट्रक तेथे जात होते. आंतरराष्ट्रीय दबावानंतर त्यांना गाझाला जाण्याची परवानगी देण्यात आली.
Covid 19 : राज्यातील निम्म्याहून अधिक रुग्ण एकट्या मुंबईत; कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world