
राज्यात बुधवारी एकाच दिवशी 105 कोरोना रुग्ण सापडले होते. मात्र, गुरुवारी रुग्ण संख्या कमी होऊन 98 वर आली होती. मात्र, शुक्रवारी दिवसभरात रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. शुक्रवारी दिवसभरात 114 रुग्ण सापडले तर एका 47 वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला. कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्या महिलेला ताप तसेच श्वसनाचा आजार होता.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
त्यामुळे आतापर्यंत राज्यात कोरोनामुळे दगावलेल्यांची संख्या 18 वर पोहोचली आहे. दरम्यान, आतापर्यंत राज्यात 15 हजार 510 चाचण्या झाल्या असून 1 हजार 276 रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी सध्या 577 सक्रिय रुग्ण आहेत. तर 681 रुग्ण बरे झाले आहेत. एकट्या मुंबईत आतापर्यंत 612 कोरोना रुग्ण सापडले आहेत. दरम्यान, देशभरात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 5 हजार 364 वर गेली आहे.
नक्की वाचा - UP News: रीलने केला घात! एकाच घरातील 6 मुली बुडाल्या, चौघींचा मृत्यू, गावावर शोककळा
दुसरीकडे देशभरात कोरोनाचे पाच हजारांहून अधिक सक्रिय रुग्ण असून राज्यात 24 तासांत 114 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर राज्यात 1 हजार 276 रुग्ण आणि मुंबईतील रुग्णसंख्या 612वर गेली आहे.
कोरोनाचा फुप्फुसांवर किती परिणाम होतो?
कोरोनाचा संसर्ग झाल्यात फुफ्फुसांवर लक्षणीय परिणाम होऊ शकतो. ज्यामुळे सौम्य ते गंभीर श्वसन समस्या उद्भवू शकतात. काही प्रकरणांमध्ये, कोविड इतका धोकादायक असतो की रुग्ण बरा झाल्यानंतरही फुफ्फुसे योग्यरित्या कार्य करू शकत नाहीत. अनेकदा कोविडमुळे फुफ्फुसांच्या क्षमतेवर परिणाम होतो.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world