जाहिरात
Story ProgressBack

'भारत दहशतवाद्यांना पाकिस्तानात घुसून मारतोय' ब्रिटीश वृत्तपत्राच्या दाव्यावर सरकारनं दिलं उत्तर

भारतामध्ये वाँटेड असलेल्या दशहवाद्यांच्या विदेशात एकापाठोपाठ एक हत्या झाल्याच्या घटना गेल्या काही महिन्यांत उघड झाल्या होत्या.

Read Time: 3 min
'भारत दहशतवाद्यांना पाकिस्तानात घुसून मारतोय' ब्रिटीश वृत्तपत्राच्या दाव्यावर सरकारनं दिलं उत्तर
'द गार्डियन' मधील रिपोर्ट भारत सरकारनं फेटाळला आहे.
मुंबई:

भारतामध्ये वाँटेड असलेल्या दशहवाद्यांच्या विदेशात एकापाठोपाठ एक हत्या झाल्याच्या घटना गेल्या काही महिन्यांत उघड झाल्या होत्या. या प्रकरणावर द गार्डियन (UK Daily The Guardian) या ब्रिटीश वृत्तपत्रानं खळबळजनक आरोप केलाय. या दहशतवाद्यांना मारण्यात तसंच त्यांच्या हत्येचा प्रयत्न करण्यात भारताचा हात असल्याचा दावा या वृत्तपत्रानं केलाय. भारतानं याबाबत इस्रायलची गुप्तचर एजन्सी मोसाद (Mossad) आणि रशियन गुप्तचर एजन्सी (KGB) यांच्यापासून प्रेरणा घेतलीय. या दोन्ही एजन्सी दुसऱ्या देशात लपून बसलेल्या आपल्या दुश्मनांचा काटा काढण्यासाठी ओळखल्या जातात. 'द गार्डियन' केलेले हे सर्व आरोप भारत सरकारनं फेटाळले आहेत. 

काय आहे संपूर्ण प्रकरण?

'द गार्डियन' मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तामध्ये भारत सरकारवर पाकिस्तानमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांना मारण्याचा आरोप करण्यात आलाय. परराष्ट्र मंत्रालयानं हे सर्व आरोप फेटाळले आहेत. 

'द गार्डियन'मधील वृत्त हे खोटे, दुर्दैवी आणि भारतविरोधी प्रचार करणारे आहे. अन्य देशांमध्ये या प्रकारच्या हत्या करणे हे भारत सरकारचे धोरण नाही, असं परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अनेकदा सांगितलंय, अशी आठवण परराष्ट्र मंत्रालयानं करुन दिली आहे.

'द गार्डियन'मधील रिपोर्टमध्ये नवी दिल्लीनं 'भारतविरोधी कृत्य करणाऱ्या लोकांना लक्ष्य करणारं धोरण तयार केलं आहे,' असा दावा केलाय. 2019 मधील पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय गुप्तचर एजन्सनीनं जवळपास 20 जणांना या पद्धतीनं ठार केल्याचं, या वृत्तामध्ये म्हंटलं आहे.

पाकिस्तानकडून देण्यात आलेले पुरावे तसंच बॉर्डरच्या दोन्ही बाजूंच्या गुप्तचर अधिकाऱ्यांच्या मुलाखतीच्या आधारावर हा रिपोर्ट तयार करण्यात आल्याचं 'द गार्डियन' नं सांगितलंय. भारतानं याबाबत  इस्रायलची गुप्तचर एजन्सी मोसाद (Mossad) आणि रशियन गुप्तचर एजन्सी (KGB) यांच्यापासून प्रेरणा घेतलीय, असं एका अज्ञात अधिकाऱ्याच्या हवाल्यानं या रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आलंय.

सौदी अरेबियातील पत्रकार जमाल खशोगी यांच्या 2018 साली झालेल्या हत्या प्रकरणाशीही या एजन्सीचं नाव जोडण्यात आलं होतं. या रिपोर्टनुसार पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी या हत्येशी संबंधित काही कागदपत्र सादर केली आहेत. त्याची स्वतंत्रपणे पडताळणी करता आलेली नाही. भारतीय गुप्तचर संस्थांनी या हत्या करण्यासाठी संयुक्त अरब अमिरात (UAE) मधील स्लिपर सेलची मदत घेतली, अशी माहिती पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी दिल्याचं या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय. 

यापूर्वी अमेरिका आणि कॅनडानं भारतावर विदेशामध्ये हत्या करणे तसंच हत्येचा प्रयत्न करण्याचा आरोप केला होता. भारत सरकारनं त्यावेळी हे सर्व आरोप स्पष्टपणे फेटाळले होते. त्याचबरोबर कॅनडाकडं या आरोपाचे पुरावेही मागितले होते.

खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येमध्ये भारताचा सहभाग असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांनी मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये केला होता. निज्जरची जून 2023 मध्ये गुरुद्वाराच्या बाहेर हत्या करण्यात आली होती. भारत सरकारनं हे सर्व आरोप निराधार असल्याचं सांगत फेटाळले होते. 

खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नूनच्या हत्येचा प्रयत्न निष्पळ केला असा दावा अमेरिकेनं केला होता. निखिल गुप्ता हा भारतीय नागरिक आणि एका भारत सरकारच्या अधिकाऱ्यानं मिळून या हत्येचा कट रचल्याचा दावा अमेरिकेनं केला होता.  

अमेरिका-कॅनडाचा नागरिक असलेला एक व्यक्ती, निखिल गुप्ता हा भारतीय नागरिक आणि एका अज्ञात भारतीय सरकारी अधिकाऱ्यानं पन्नूनच्या हत्येची योजना तयार केली होती, असा दावा अमेरिकेनं केला होता.

अमेरिकेच्या आरोपानं भारत सरकारनं तातडीनं स्पष्टीकरण दिलं होतं. 'अमेरिकनं दिलेल्या माहितीची भारत सरकारनं गांभीर्यानं दखल घेतली आहे. ही माहिती आमचे राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावर परिणाम करणारी आहे. या माहितीची संबंधित विभागाकडून पडताळणी करण्यात येत आहे,' असं परराष्ट्र मंत्रालयाचे माजी प्रवक्ता अरिंदम बागची यांनी सांगितलं होतं. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination