जाहिरात

Salman Khan News: पाकिस्तानचा बालिशपणा! अभिनेता सलमान खान अतिरेकी घोषित, अटक होणार?

हिंदी चित्रपटांबद्दल बोलताना त्याने बलूचिस्तानचा (Balochistan) उल्लेख एका 'वेगळ्या देशा'प्रमाणे केला, जो पाकिस्तानला अजिबात मान्य झाला नाही.

Salman Khan News: पाकिस्तानचा बालिशपणा! अभिनेता सलमान खान अतिरेकी घोषित, अटक होणार?

Salman Khan Declared A Terrorist By Pakistan: बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) च्या एका वक्तव्यामुळे पाकिस्तान (Pakistan) चांगलाच तिळमिळाला आहे. रियाधमधील एका कार्यक्रमात सलमान खानने केलेल्या विधानामुळे संतप्त झालेल्या पाकिस्तानने त्यांना थेट 'दहशतवादी' (Terrorist) घोषित करत, त्याचे नाव 'दहशतवाद विरोधी अधिनियम (१९९७)' च्या चौथ्या शेड्यूलमध्ये (Fourth Schedule) टाकले आहे.

नेमका वाद काय आहे?

सलमान खानने रियाध येथे आयोजित केलेल्या 'जॉय फोरम २०२५' (Joy Forum 2025) मध्ये शाहरुख खान आणि आमिर खानसोबत हजेरी लावली होती. हिंदी चित्रपटांबद्दल बोलताना त्याने बलूचिस्तानचा (Balochistan) उल्लेख एका 'वेगळ्या देशा'प्रमाणे केला, जो पाकिस्तानला अजिबात मान्य झाला नाही.

नक्की वाचा - Jalgaon Mumbai Flight: जळगावकरांसाठी Good News! मुंबई फक्त दीड तासांवर, दररोज विमान सेवा सुरु, वाचा वेळापत्रक

सलमान खानने नेमके काय म्हटले?

 "आत्ता, जर तुम्ही एक हिंदी चित्रपट बनवला आणि तो येथे (सौदी अरेबियात) प्रदर्शित केला, तर तो सुपरहिट होईल. जर तुम्ही तमिळ, तेलुगू किंवा मल्याळम चित्रपट बनवला, तर तो शेकडो कोटींचा व्यवसाय करेल, कारण येथे अनेक देशांतील लोक आले आहेत. येथे बलूचिस्तानचे लोक आहेत, अफगाणिस्तानचे लोक आहेत, पाकिस्तानचे लोक आहेत... प्रत्येकजण येथे काम करत आहे," असं सलमान खान म्हणाला होता. 

पाकिस्तानची तात्काळ कारवाई: 

सलमान खानच्या या वक्तव्यानंतर पाकिस्तानमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला. पाकिस्तानी लोकांना तसेच शहबाज शरीफ (Shehbaz Sharif) सरकारला हे विधान रुचले नाही. पाकिस्तानच्या शहबाज शरीफ सरकारने तातडीने अधिकृत अधिसूचना (Official Notification) जारी करून सलमान खानला 'दहशतवादी' म्हणून घोषित केले आणि त्यांचे नाव 'दहशतवाद विरोधी अधिनियम (१९९७)' च्या चौथ्या शेड्यूलमध्ये टाकले आहे.

'चौथ्या शेड्यूल'मध्ये समावेश म्हणजे काय? ज्या व्यक्तींवर दहशतवादाशी (Terrorism) संबंध असल्याचा संशय असतो, अशा व्यक्तींसाठी ही यादी असते. या शेड्यूलमध्ये सलमान खानचा समावेश झाल्यामुळे त्याच्या गतिविधींवर (Activities) कडक नजर ठेवली जाईल. पाकिस्तानमध्ये त्यांच्या ये-जा करण्यावर (Movement) प्रतिबंध लादला जाऊ शकतो. त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई देखील होण्याची शक्यता आहे.

Satish Shah Net Worth : एका चित्रपटासाठी किती फी घ्यायचे सतीश शाह, आज त्यांची संपत्ती किती आहे? 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com