Solapur News : अखेर मोठ्या प्रतीक्षेनंतर भारत-अमेरिका व्यापार करार होणार आहे. भारतावरील टॅरिफही कमी कऱण्यास ट्रम्प यांनी सहमती दर्शवली आहे. सोमवारी रात्री एक फोन कॉल झाला आणि त्यानंतर ट्रम्प यांनी सोशल मीडियावरून या संभाषणाचा तपशील जाहीर केला. भारत य़ुरोपीय संघाचा करार झाल्यानंतर सातच दिवसात अमेरिकाही भारतासह करार करण्यास तयार झाली. इतिहासात पहिल्यांदाच एका वर्षात भारतानं पाच व्यापार करार केलेत. भारतासाठी हा एक मोठा कुटनीतीक आणि आर्थिक विजय म्हणता येईल.
सोलापुरातील वस्त्रोद्योगाला ‘अच्छे दिन' येण्याची शक्यता
अमेरिकेने भारतावर लागू केलेल्या 25 टक्के टेरिफमुळे सोलापुरातील वस्त्रोद्योगाला मोठा फटका बसला होता. सोलापुरातील वस्त्रोद्योगाच्या एकूण निर्यातीपैकी सुमारे 25 टक्के निर्यात अमेरिकेत केली जाते. मात्र आता अमेरिकेने टेरिफ 25 टक्क्यांवरून 18 टक्के केल्याने सोलापुरातील वस्त्रोद्योगाला दिलासा मिळाला असून ‘अच्छे दिन' येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टेरिफ कमी केल्यामुळे सोलापुरातील वस्त्रोद्योगाला मोठा फायदा होणार आहे. या पार्श्वभूमीवर सोलापुरातील वस्त्रोद्योग व्यापाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
सोलापुरातून दरवर्षी सुमारे 800 कोटी रुपयांची वस्त्रोद्योगाची निर्यात होते. यापैकी एकट्या अमेरिकेत जवळपास 200 कोटी रुपयांचे कापड सोलापुरातून निर्यात केले जाते. यापूर्वी टेरिफ वाढवण्यात आल्याने निर्यातीवर परिणाम झाला होता. मात्र आता टेरिफ 18 टक्के राहणार असल्याने पाकिस्तान आणि बांगलादेशसारख्या देशांच्या तुलनेत भारताचा टेरिफ कमी असणार आहे. त्यामुळे सोलापुरातील वस्त्रोद्योगाला स्पर्धात्मक फायदा मिळणार आहे. या निर्णयाबद्दल सोलापुरातील व्यापाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे.
भारत अमेरिका ट्रेड डीलचा भारताला कसा फायदा होणार आहे? भारतावर याआधी अमेरिकेनं ५० टक्क्यांपर्यंतचा टॅरिफ लादला होता.
भारत-अमेरिका टॅरिफ टाईमलाईन
2 एप्रिल 2025
अमेरिकेकडून भारतावर 10% बेसलाईन टॅरिफ
5 एप्रिल 2025
भारतावर 26% कर लादण्याची ट्रम्प यांची घोषणा
9 एप्रिल 2025
90 दिवसांसाठी कर रद्द करण्याची अमेरिकेची घोषणा
10 जुलै 2025
भारताकडून WTO मध्ये 32 हजार कोटींचं प्रत्युत्तर शुल्क प्रस्तावित
31 जुलै 2025
अमेरिकेचा भारतावर 25% टॅरिफ लादण्याची परस्पर घोषणा
1 ऑगस्ट 2025
भारतावर 25% परस्पर कर लादला
6 ऑगस्ट 2025
रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे भारतावर अतिरिक्त 25% कर
27 ऑगस्ट 2025
भारतावर एकूण 50% टॅरिफ लागू
03 फेब्रुवारी 2026
अमेरिकेची नवी डील, भारतावर 50% वरुन 18% टॅरिफ
व्हाईट हाऊसच्या मते, भारतानं रशियन तेलखरेदी थांबवल्यानंतर त्याच्यावर लावलेला २५ टक्के टॅरिफ हटवण्यात येईल त्यामुळे प्रत्यक्षात आता १८ टक्केच टॅरिफ असेल