'पालक पनीर'वरून वाद; 2 भारतीय विद्यार्थ्यांची अमेरिकेत कायदेशीर लढाई, कोट्यवधी रुपये मिळवले

आदित्य प्रकाश युनिव्हर्सिटीच्या मानववंशशास्त्र (Anthropology) विभागात पीएचडी करत होते. दुपारच्या जेवणासाठी ते कॉमन मायक्रोवेव्हमध्ये 'पालक पनीर' गरम करत असताना एका महिला कर्मचारीने तिथे येऊन अन्नाच्या "तीव्र वासाबाबत" तक्रार केली आणि त्यांना मायक्रोवेव्ह वापरण्यास मनाई केली.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • Two Indian PhD students sued University of Colorado for discrimination over Indian food use
  • They faced accusations and a hostile environment after heating palak paneer in a shared microwave
  • The university withheld their earned master's degrees and terminated one student's assistantship
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ कोलोराडो बोल्डर (University of Colorado Boulder) मधील दोन भारतीय पीएचडी (PhD) विद्यार्थ्यांनी अन्नाच्या वासावरून झालेल्या भेदभावाविरुद्धची कायदेशीर लढाई जिंकली आहे. आदित्य प्रकाश आणि उर्मी भट्टाचार्य अशी या विद्यार्थ्यांची नावे असून त्यांना सुमारे 200,000 डॉलर म्हणजे सुमारे 1.80 कोटी रुपये इतकी नुकसानभरपाई त्यांना मिळाली आहे. या प्रकरणाने केवळ शैक्षणिक वर्तुळातच नव्हे तर जागतिक स्तरावर 'सांस्कृतिक भेदभाव' या विषयावर मोठी चर्चा घडवून आणली आहे.

'पालक पनीर'वरून वाद

ही घटना 5 सप्टेंबर 2023 रोजी घडली. आदित्य प्रकाश युनिव्हर्सिटीच्या मानववंशशास्त्र (Anthropology) विभागात पीएचडी करत होते. दुपारच्या जेवणासाठी ते कॉमन मायक्रोवेव्हमध्ये 'पालक पनीर' गरम करत असताना एका महिला कर्मचारीने तिथे येऊन अन्नाच्या "तीव्र वासाबाबत" तक्रार केली आणि त्यांना मायक्रोवेव्ह वापरण्यास मनाई केली.

आदित्य यांनी असा युक्तिवाद केला की, अन्नाचा वास चांगला की वाईट हे सांस्कृतिक दृष्टिकोनावर अवलंबून असते. मात्र, हा वाद तिथेच थांबला नाही. आदित्य यांनी विरोध केल्यावर, त्यांना वरिष्ठ विद्याशाखेच्या बैठकीत बोलावून "कर्मचाऱ्यांना असुरक्षित वाटण्यास कारणीभूत ठरल्याचा" आरोप करण्यात आला.

(नक्की वाचा-  What is PADU: काय आहे 'पाडू'? मुंबई महापालिका निवडणुकीत पहिल्यांदाच होणार वापर)

आदित्य यांची जोडीदार उर्मी भट्टाचार्य हिने पाठिंबा दिल्यावर, तिला कोणत्याही स्पष्टीकरणाशिवाय तिच्या टीचिंग असिस्टंट पदावरून काढून टाकण्यात आले. सर्वात गंभीर बाब म्हणजे, पीएचडीच्या प्रवासादरम्यान मिळणारी मास्टर डिग्री विद्यापीठाने त्यांना देण्यास नकार दिला.

Advertisement

कायदेशीर लढा आणि निकाल

विद्यापीठाच्या या वागणुकीमुळे आदित्य आणि उर्मी यांनी अमेरिकेच्या जिल्हा न्यायालयात धाव घेतली. त्यांनी आरोप केला की, 'किचन पॉलिसी'च्या नावाखाली दक्षिण आशियाई विद्यार्थ्यांवर अन्याय केला जात आहे. दोन वर्षांच्या संघर्षानंतर विद्यापीठाने नमती भूमिका घेतली. दोन्ही विद्यार्थ्यांना मिळून 200,000 डॉलर देण्यात आले. विद्यापीठाने त्यांची रखडलेली 'मास्टर डिग्री' त्यांना बहाल केली. मात्र, या समझोत्यानुसार हे दोघेही आता या विद्यापीठात पुन्हा शिक्षण घेऊ शकणार नाहीत किंवा तिथे नोकरी करू शकणार नाहीत.

Advertisement

(नक्की वाचा- Holiday News: राज्यातील 29 शहरांमध्ये 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; वाचा शहरांची संपूर्ण यादी)

उर्मीची भावनिक पोस्ट

निकालानंतर उर्मीने इंस्टाग्रामवर आपली भावना व्यक्त केली. तिने लिहिले, "हा केवळ अन्नासाठीचा लढा नव्हता, तर आपल्या ओळखीसाठी आणि सन्मानासाठी दिलेली झुंज होती. माझ्या त्वचेचा रंग किंवा माझा भारतीय उच्चार यामुळे मला कोणी गप्प करू शकत नाही."