जाहिरात

What is PADU: काय आहे 'पाडू'? मुंबई महापालिका निवडणुकीत पहिल्यांदाच होणार वापर

BMC Elections: PADU (Printing Auxiliary Display Unit) ही यंत्रणा अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. मेसर्स भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL), बंगळुरू यांनी ही यंत्रणा विकसित केली आहे.

What is PADU: काय आहे 'पाडू'? मुंबई महापालिका निवडणुकीत पहिल्यांदाच होणार वापर

BMC Elections : मुंबई महापालिका निवडणुकीची मतमोजणी 16 जानेवारीला पार पडणार आहे. मुंबई महापालिकेच्या 227 प्रभागांसाठी होणाऱ्या निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि निर्विघ्न पार पाडण्यासाठी प्रशासनाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे ठरवले आहे.

यामध्ये PADU (Printing Auxiliary Display Unit) ही यंत्रणा अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. मेसर्स भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL), बंगळुरू यांनी ही यंत्रणा विकसित केली आहे. मुंबई महापालिकेला अशा 140 यंत्रांचा पुरवठा करण्यात आला आहे.

(नक्की वाचा- Holiday News: राज्यातील 29 शहरांमध्ये 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; वाचा शहरांची संपूर्ण यादी)

'PADU' म्हणजे काय?

साध्या भाषेत सांगायचे तर, 'पाडू' हे मतदान यंत्रातील डेटा वाचणारे आणि तो कागदावर प्रिंट करणारे एक सहायक साधन आहे. जर मतमोजणीच्या वेळी मुख्य कंट्रोल युनिटचा डिस्प्ले खराब झाला किंवा त्यातून निकाल दिसण्यात अडचण आली, तर 'पाडू' यंत्राचा वापर केला जातो.

हे यंत्र कंट्रोल युनिटला जोडून त्यातील रेकॉर्ड झालेली मते थेट कागदावर प्रिंट स्वरूपात मिळवता येतात. या यंत्रामुळे तांत्रिक बिघाड होऊनही मतमोजणीची प्रक्रिया थांबत नाही आणि उमेदवारांना लेखी निकाल त्वरित पाहता येतो.

(नक्की वाचा-  Latur News: पैसा नसताना लढली अन् जिंकली, मात्र नियतीने हरवलं; नवनिर्वाचित नगरसेविकेच्या मृत्यूने हळहळ)

'पाडू' कधी वापरले जाईल?

नियमांनुसार, मतमोजणी करताना प्रथम कंट्रोल युनिटला बॅलेट युनिट जोडून मते तपासली जातात. मात्र, जर या जोडणीनंतरही निकाल दिसत नसेल, तरच 'पाडू' यंत्राचा वापर करून निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाते. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात या यंत्रणेची तरतूद करण्यात आली आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com