
Power Outage In Europe: स्पेन, पोर्तुगाल आणि फ्रान्स या तीन देशात हाहाकार माजला आहे. या तीनही देशातील अनेक शहरांमधील वीज गायब झाली. वीज पुरवठा खंडीत झाल्याने रेल्वे वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. रेल्वे स्टेशन अंधारात बुडाल्याने प्लॅटफॉर्मवर प्रवाशांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. माद्रीद, बार्सिलोना आणि लिस्बन या तीन शहरांना वीज पुरवठा खंडीत होण्याचा सर्वाधिक फटका बसल्याचे कळते आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
फ्रान्सचे अनेक भागही अंधारात बुडाल्याचे अनेकांनी सोशल मीडियावर म्हटले आहे. वीजपुरवठा खंडीत होण्यामागचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. वीज पुरवठा खंडीत झाल्याने मेट्रोची सिग्नल यंत्रणा बंद पडली होती. ज्यामुळे मेट्रो स्थानके रिकामी करण्यात आली. बार्सिलोना शहरामध्येही वीजपुरवठा खंडीत झाला होता, ज्यामुळे ट्राम सेवा खंडीत झाली. वाहतूक व्यवस्थेप्रमाणे दूरसंचार यंत्रणेवरही याचा परिणाम झाला. इंटरनेट आणि टेलिफोन सेवेला वीज गायब होण्याचा फटका बसला.
(नक्की वाचा: Pahalgam Terrorist Attack : शाहिद आफ्रिदीने पुन्हा गरळ ओकली, "भारत स्वतःच्या लोकांना मारतो...")
खंडीत वीजपुरवठ्यामुळे माद्रीद येथे सुरू असलेला टेनिसचा सामना थांबवावा लागला तसेच स्पेनमधील रेनफे या रेल्वे कंपनीने सगळ्या गाड्यांची वाहतूक थांबवण्याच आल्याचे सांगितले. स्पेनमधील अनेक शहरांमधील वीजपुरवठा खंडीत झाल्याचे वृत्त आहे. ग्रीडवर लक्ष ठेवून असणारी कंपनी ई-रिडसने वीज पुरवठा खंडीत होण्यामागचे कारण अद्याप कळाले नसल्याचे म्हटले आहे. युरोपाच्या अनेक भागांना वीज गायब झाल्याने फटका बसल्याचे वृत्त आहे.
This is what a power outage in Europe looks like: subways and airports are down, and the streets are in chaos.
— Jürgen Nauditt 🇩🇪🇺🇦 (@jurgen_nauditt) April 28, 2025
According to the latest information, the power outage affected not only Spain and Portugal, but also parts of France, the Netherlands, and Belgium. What exactly… pic.twitter.com/DXrwlb5i26
There has been a nationwide power outage in Spain.
— Ada Lluch (@ada_lluch) April 28, 2025
My grandpa is in the middle of a surgery.
SPAIN IS THE NEW CUBA!
Please pray for my grandpa. I am so worried.
पोर्तुगाल प्रशासनाने अधिकृतरित्या दिलेल्या माहितीनुसार देशाच्या अनेक भागांमधील वीज पुरवठा खंडीत झाला होता. माद्रीदच्या 'बाराजास' आंतरराष्ट्रीय विमानतळाचाही वीज पुरवठा खंडीत झाल्याने विमान वाहतुकीवर परिणाम झाला होता. इतर विमानतळांवरही वीज पुरवठा खंडीत झाल्याने विपरीत परिणाम झाला होता.
(नक्की वाचा: New Pope Election : अत्यंत रहस्यमय असते पोपची निवड, काळ्या आणि पांढऱ्या धुराचा आहे खास अर्थ)
युरोन्यूज पोर्तगालने दिलेल्या माहितीनुसार स्पेन आणि पोर्तुगालच्या राजधान्यांमध्ये अनेक प्रवासी मेट्रोमध्ये अडकले होते. तिथले मेट्रो जाळे भुयारी स्वरुपाचे असल्याने मेट्रो रेल्वे एकामागोमाग एक बोगद्यामध्ये अडकून पडल्या आहेत. युरोन्यूज स्पेनने दिलेल्या वृत्तानुसार स्पेन सरकारने तातडीची बैठक बोलावली आहे. मोनक्लोआमधील या बैठकीद्वारे परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. बेल्जिअमपर्यंतचा वीजपुरवठा खंडीत झाल्याचे वृत्त आहे. युरोपिअन ग्रीडमध्ये समस्या निर्माण झाल्याने युरोपातील काही देश अंधारात बुडाले आहेत. फ्रान्समधील अलारीक पर्वतावर आग लागली होती, ज्यामुळे पेरपिग्नन आणि नरबोनमधील उच्च दाबाने वीजपुरवठा करणारी लाइन खंडीत झाली होती. हेच या वीजपुरवठा खंडीत होण्यामागचे प्राथमिक कारण सांगितले जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world