Iran Vs Israel : "शिक्षा देणारच..." इराणचं इस्रायलला प्रत्युत्तर, 150 क्षेपणास्त्रे डागून झोप उडवली

इराणने असाही दावा केला आहे की त्यांनी हवाई हल्ल्यादरम्यान दोन इस्रायली लढाऊ विमाने पाडली आहेत. इस्रायलमधील वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या या हल्ल्यात सुमारे 14 जण जखमी झाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

इस्रायल आणि इराणमधील तणाव आणखी वाढताना दिसत आहे. इस्रायलने इराणच्या अणु आणि लष्करी तळांना लक्ष्य केले. आता इराणने प्रत्युत्तर देत इस्रायलवर हल्ला चढवला आहे. इराणने इस्रायलवर एकाच वेळी 150 क्षेपणास्त्रे डागली. त्याच वेळी, एका इस्रायली पायलटलाही पकडण्यात आल्याचा दावा केला जात आहे. मात्र इस्रायलने हे स्पष्टपणे नाकारले आणि म्हटले की आमचे सर्व पायलट सुरक्षित आहेत. 

इराणने असाही दावा केला आहे की त्यांनी हवाई हल्ल्यादरम्यान दोन इस्रायली लढाऊ विमाने पाडली आहेत. इस्रायलमधील वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या या हल्ल्यात सुमारे 14 जण जखमी झाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. देशात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर एक गंभीर इशारा जारी करण्यात आला आहे. कारवाईनंतर 16 तासांनंतरही इस्रायली हवाई दलाने इराणच्या अणुस्थळांना लक्ष्य करणे सुरूच ठेवले आहे.

Advertisement

इराणने हवाई हल्ल्याला प्रत्युत्तर देत इस्रायलच्या दिशेने एकाच वेळी शेकडो बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली आहेत. इराणच्या सरकारी वृत्तसंस्थे IRNA कडून ही माहिती समोर आली आहे. इस्रायली चॅनल 13 ने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, ग्रेटर तेल अवीव परिसरात यापूर्वी कधीही न पाहिलेला प्रचंड विनाश झाला आहे. इराणी इंटरसेप्टर क्षेपणास्त्रांनी डझनभर इमारती आणि वाहनांना धडक दिली आहे.

इराणच्या हल्ल्यानंतर, इस्रायलमध्ये हवाई हल्ल्याचे सायरन वाजू लागले आहेत. जेरुसलेममध्ये सर्वत्र स्फोटांचे आवाज ऐकू आले. इस्रायली टीव्ही स्टेशन्सनी क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर तेल अवीवमध्ये धुराचे लोट उठताना दाखवले. यामुळे झालेल्या नुकसानाची व्याप्ती अद्याप उघड झालेली नाही. मात्र, लष्कराचे म्हणणे आहे की डझनभर क्षेपणास्त्रे डागण्यात आली आहेत.

इराणचे सर्वोच्च नेते खामेनी म्हणाले की, हल्ल्याबद्दल इस्रायलला शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही. आमचे सैन्य त्यांच्यासाठी समस्या निर्माण करेल.