जाहिरात

इराणचा बदला घेण्यासाठी कसा करणार इस्रायल हल्ला? काय आहे दोन्ही देशांची शक्ती?

इराणचा बदला घेण्यासाठी कसा करणार इस्रायल हल्ला? काय आहे दोन्ही देशांची शक्ती?
मुंबई:


Israel vs Iran War : 'इराणचे नेते लेबनान आणि गाझाच्या संरक्षणाच्या बाता करत आहेत. पण, ते संपूर्ण क्षेत्राला अंधारात आणि युद्धाच्या दिशेनं ढकलत आहेत. पश्चिम आशियात अशी कोणतीही जागा नाही जिथं आम्ही पोहचू शकत नाही. आमच्या लोकांचं संरक्षण करु शकत नाही. इराणी आणि ज्यू जगातील दोन सर्वोत्तम वंश आहेत. इराण लवकरच स्वतंत्र होईल. त्यानंतर इराणमध्ये शांतता आणि समृद्धी येईल.'

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हा इशारा दिला आहे. इराणी जनतेला 30 सप्टेंबर रोजी संबोधून केलेल्या वक्तव्यामध्ये त्यांनी हा इशारा दिला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी इराणनं इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा वर्षाव केला. इराणला या हल्ल्याची किंमत चुकवावी लागेल, असा इशारा नेतन्याहू यांनी दिला आहे. त्यानंतर इस्रायलचं पुढचं पाऊल काय असेल? इस्रायल इराणचा कसा बदला घेणार? याबाबत चर्चा सुरु झाली आहे. 

इस्रायल आणि इराण यांचा परस्परांना इशारा

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इस्रायल त्याच्या शत्रूंचा बदला घेण्यासाठी कटिबद्ध असल्याचं जाहीर केलं आहे. इराणला हे लवकच समजेल. आम्ही जे नियम बनवलेत त्यावर कायम आहोत. आमच्यावर जो हल्ला करेल आम्ही त्यावर हल्ला करु असं नेतन्याहू यांनी जाहीर केलंय.  इस्रायलच्या सैन्याचे प्रवक्ते डॅनियल हगारी यांनी देखील वायू सेना या हल्ल्याला चोख उत्तर देईल. आमच्याकडं योजना आहे. आम्ही ठरलेलेल्या वेळी आणि ठरलेल्या जागांवर हल्ला करु अशी घोषणा केलीय. 

इराणच्या इस्लामिक रेवोल्यूशनरी गार्ड कोरनं (आयआरजीसी) इस्रायलला प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे. इस्रायलनं हल्ला केला तर इराणी प्रतिक्रिया विनाशकारी असल्याचं त्यांनी म्हंटलं आहे. 

आज गांधीजी असते तर इराण-इस्रायल युद्ध थांबलं असतं का? वाचा AI नं काय दिलं उत्तर

( नक्की वाचा : आज गांधीजी असते तर इराण-इस्रायल युद्ध थांबलं असतं का? वाचा AI नं काय दिलं उत्तर )

इस्रायल कसा करणार हल्ला?

इस्रायलनं इराणवर हल्ला करण्याची शपथ घेतली आहे. पण, हा हल्ला त्यांनी गाझा किंवा लेबनानमध्ये केलेल्या हल्ल्यापेक्षा वेगळा असेल, असं मानलं जातंय.

या दोन्ही देशांची सीमा इस्रायलला लागून आहे. त्यामुळे तिथं जमिनीवरचं युद्ध शक्य आहे. इराण आणि इस्रायलमध्ये दोन हजार किलोमीटरपेक्षा जास्त अंतर आहे. त्यामध्ये अनेक देश आहेत. 

इस्रायलनं इराणवर हवाई हल्ला करण्याचं ठरवलं तरी त्याला त्या देशांच्या हवाई सीमेची परवानगी घ्यावी लागेल. पश्चिम आशियातील अमेरिकेच्या तळावरुन इस्रायल हल्ला करेल, अशीही चर्चा आहे. पण, अमेरिका त्यासाठी परवानगी देईल, असं वाटत नाही. या परिस्थितीमध्ये इस्रायलकडं क्षेपणास्त्र हल्ला हा एकच पर्याय उपलब्ध आहे. इस्रायलकडून इराणमधील महत्त्वाच्या ठिकाणांवर क्षेपणास्त्र हल्ला केला जाऊ शकतो. 

Latest and Breaking News on NDTV

इस्रायल शत्रूचं नुकसान कसं करतं?

स्वत:च्या शत्रूचं आर्थिक नुकसान करण्याचा इस्रायलचा नेहमी प्रयत्न असतो. त्याचप्रमाणे विरोधी नेते तसंच अधिकारी त्यांचे लक्ष्य असताता. नुकताच हमासाचा प्रमुख इस्माइल हानिया आणि हिजबुल्लाहचा प्रमुख नसरल्लाहची इस्रायलनं हत्या केली आहे. त्याचबरोबर इराणच्या अनेक मोठ्या अधिकाऱ्यांनाही इस्रायलनं लक्ष्य केलं आहे. त्यामध्ये इराणच्या अण्विक कार्यक्रमाशी संबंधित वैज्ञानिकांचा ही समावेश आहे. इस्रायल यंदा देखील या पद्धतीनं हल्ला करण्याची शक्यता आहे. इराणसोबतची जमिनीवरचं युद्ध टाळण्याचा त्याचा प्रयत्न असेल. 

इस्रायलकडून हल्ल्याची तयारी सुरु आहे. पण, इराण कमकुवत देश नाही याची जाणीव त्यांना नक्कीच असेल. इराणकडं पश्चिम आशियातील अत्याधुनिक क्षेपणास्त्र आहेत. इराणनं नेहमीच त्यांच्या आश्रयात असलेल्या दहशतवादी संघटनेचा पुरवठा इराणकडूनच केला जातो. 

Iran Attacks Israel Video : पश्चिम आशियातील संघर्षाला मोठं वळण, इराणचा इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला

( नक्की वाचा :  Iran Attacks Israel Video : पश्चिम आशियातील संघर्षाला मोठं वळण, इराणचा इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला )

सायबर युद्ध

इराणची सायबर हल्ला करण्याची क्षमताही मोठी आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या टीमवर सायबर हल्ला झाल्याचा आरोप केला आहे. या हल्ल्याला इराणच्या सायबर गुन्हेगारांना जबाबदार ठरवलं होतं. सात ऑक्टोर रोजी हमासं इस्रायलनं केलेल्या हल्ल्यानंतर इराणचे सायबर हल्ले आणखी तीव्र झाले आहेत. इराणनं इस्रायलवर जवळपास चार हजार सायबर हल्ले केले आहेत, असा अंदाज आहे. 

इराणनं या प्रकारे इस्रायलवर या पद्धतीचे हल्ले तीव्र केले तर इस्रायलला मोठं नुकसान सहन करावं लागू शकतं. अर्थात या प्रकारच्या हल्ल्यांमध्ये इस्रायल देखील मागं नाही. इस्रायलनं गेल्यावर्षी इराणमधील पेट्रोल पंपांच्या नेटवर्कवर सायबर हल्ला केला होता. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

इराण आणि इस्रायलमध्ये आत्तापर्यंत कधीही प्रत्यक्ष युद्ध झालेलं नाही. दोन्ही देशांनी आजवर अप्रत्यक्षपणे एकमेकांना लक्ष्य केलंय. यंदाही तसंच होण्याची शक्यता आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com