सोशल मीडिया इन्फ्लूएंसरची घराबाहेर गोळ्या झाडून हत्या, घटना VIDEOमध्ये कैद

Om Fahad Shot Dead: सोशल मीडिया इन्फ्लूएंसरची एका अज्ञाताने गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. काळे कपडे आणि हेल्मेट घातलेल्या बाइकस्वाराने इन्फ्लूएंसरवर जीवघेणा हल्ला केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Om Fahad Shot Dead: इराकमधील सोशल मीडियावरील प्रसिद्ध इन्फ्लूएंसर ओम फहादची (Om Fahad Shot Dead) शनिवारी (27 एप्रिल) उशीरा रात्री तिच्या घराबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. बगदादमधील जोयुना जिल्ह्यामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. 'अल जझीरा' या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, शॉर्ट व्हिडीओ अ‍ॅप कॉन्टेंट क्रीएटर ओम फहादवर अज्ञाताने गोळीबार करून तिची हत्या केली.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा)

बाइकस्वाराने केला हल्ला

बाइकवरून आलेल्या हल्लेखोराने काळे कपडे आणि हेल्मेट घातले होते. ओम (Om Fahad Shot Dead) आपल्या कारमध्ये बसलेली असताना हल्लेखोर तेथे आला आणि त्याने गोळ्या झाडून तिची निर्घृण हत्या केली. 'अल जझीरा'ने दिलेल्या माहितीनुसार, हत्याकांडाचा तपास करण्यासाठी सरकारतर्फे एक पथक स्थापन करण्यात आले आहे. ओम फहादचे खरे नाव 'गुफरान सावादी' असे आहे, ती पॉप म्युझिकवर डान्स करून आपले व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असे. ओम अतिशय लोकप्रिय होती आणि तिला फॉलो करणाऱ्यांची संख्या मिलिअन्समध्ये होती. 

(नक्की वाचा: अति घाई संकटात नेई! अमेरिकेत गुजरातच्या 3 महिलांचा मृत्यू, हवेत 20 फुट उंच उडाली कार)

ओमला ठोठावण्यात आली होती 6 महिन्यांची शिक्षा

फेब्रुवारी 2023 मध्ये ओमला (Om Fahad Shot Dead) न्यायालयाने सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली होती. तिने शूट केलेल्या व्हिडीओतील भाषेवर कोर्टाने आक्षेप नोंदवला होता. यादरम्यान आणखी पाच ऑनलाइन कॉन्टेंट क्रीएटर्संना देखील दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनवाण्यात आली होती आणि अन्य क्रीएटर्सविरोधात तपासही सुरू होता.  

(नक्की वाचा: संतापजनक! 12 वर्षीय मुलीवर बॉयफ्रेंडसह 4 अल्पवयीन मुलांनी केला गँगरेप, दगडाने ठेचून केली हत्या)

इराणमधील सरकारची आक्षेपार्ह कॉन्टेंटविरोधात कठोर कारवाई

जानेवारी 2023 मध्ये इराणमधील सरकारने इराकी समाजातील नैतिकता आणि कौटुंबिक परंपरांचे संरक्षण करण्याच्या कथित प्रयत्नामध्ये ओम फहादसारख्या क्रीएटर्सकडून ऑनलाइन पोस्ट करण्यात येणाऱ्या आक्षेपार्ह कॉन्टेंटचा शोध घेण्यासाठी समिती सुरू केल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. 

Advertisement

ओमने तयार केले होते ऑनलाइन प्लॅटफॉर्म, कारण...

'अल जझीरा'ने दिलेल्या वृत्तानुसार, ओमने (Om Fahad Shot Dead) एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म देखील तयार केले होते, ज्याद्वारे कोणताही कॉन्टेंट हटवल्यानंतर तक्रार करण्यास इराकी युजर्संना प्रोत्साहन दिले जाते होते.   

यावेळेस अधिकाऱ्यांनी दावा केला होता की जनतेने या व्यासपीठाचे स्वागत केले आणि जनतेकडून हजारो रिपोर्ट्स देखील दाखल करण्यात आले होते. सरकारच्या कठोर भूमिकेनंतर काही क्रीएटर्संना माफी मागावी लागली तर काहींना आपल्या पोस्ट सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून हटवाव्या लागल्या.   

दरम्यान, ओम फहादची हत्या कोणी आणि का केली? यामागील ठोस माहिती व कारण स्पष्ट झालेले नाही. 

VIDEO: डुकरांमुळे माणसांना कसं मिळतंय जीवदान?

Topics mentioned in this article