Israel-Hamas War : 1 वर्ष 3 महिने 15 दिवसांनी गाझा शांत होणार, इस्रायल-हमास युद्ध अखेर थांबलं

Gaza Ceasefire Deal: युद्धबंदी कराराची घोषणा होऊनही इस्रायलचे हल्ले थांबत नाहीत. या कराराच्या घोषणेनंतर इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात डझनभर लोक मारले गेले आहेत. गेल्या 24 तासांत गाझामधील सुमारे 50 लक्ष्यांवर हल्ला केल्याचे लष्कराने गुरुवारी सांगितले. 

जाहिरात
Read Time: 2 mins

इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेलं युद्ध अखेर थांबलं आहे. इस्रायली कॅबिनेटने शनिवारी पहाटे गाझा युद्धविराम आणि बंधकांच्या सुटकेच्या कराराला मंजुरी दिली आहे. इस्रायलच्या मंत्रिमंडळाने शनिवारी पहाटे गाझा युद्धविराम आणि ओलिसांची सुटका करार मंजूर करण्यासाठी मतदान केले, असे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या कार्यालयाने सांगितले. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

"सरकारने बंधक वापसी योजनेला मंजुरी दिली आहे," असे त्यांच्या कार्यालयाने सांगितले. तसेच हमाससोबतचा संघर्ष थांबवण्याचा करार रविवारी अमलात येईल, असेही सांगितले. 

इस्रायलच्या मंत्रिमंडळाची बैठक सहा तासांहून अधिक काळ चालली. नेतन्याहू यांच्या कार्यालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, सरकारने शनिवारी पहाटे या कराराला मंजुरी दिली. मात्र, काही कट्टरवादी नेत्यांनी या कराराला कडाडून विरोध केला. मीडिया रिपोर्ट्सनुसार नेतन्याहू यांच्या आघाडी सरकारच्या 24 मंत्र्यांनी कराराच्या बाजूने मतदान केले, तर आठ जणांनी विरोध केला. 

(नक्की वाचा- Saif Ali khan Attack : ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचा सैफवर झालेल्या हल्ल्याशी संबंध नाही, पोलिसांचं स्पष्टीकरण)

सहा आठवड्यांच्या या युद्धबंदीला रविवारपासून सुरुवात होणार आहे. या दरम्यान ओलिसांच्या बदल्यात कैद्यांची देवाणघेवाण केली जाईल. त्यामुळे गाझामधील 15 महिन्यांपासून सुरू असलेले युद्ध संपण्याचा मार्ग खुला होऊ शकतो, असे मानले जात आहे. इस्रायलच्या न्याय मंत्रालयाने मुक्त करण्यात येणाऱ्या 95 पॅलेस्टिनींची यादी प्रसिद्ध केली आहे. याबाबत शासनाच्या परवानगीची प्रतीक्षा आहे. यामध्ये 69 महिला, 16 पुरुष आणि 10 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. 

दुसरीकडे, युद्धबंदी कराराची घोषणा होऊनही इस्रायलचे हल्ले थांबत नाहीत. या कराराच्या घोषणेनंतर इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात डझनभर लोक मारले गेले आहेत. गेल्या 24 तासांत गाझामधील सुमारे 50 लक्ष्यांवर हल्ला केल्याचे लष्कराने गुरुवारी सांगितले. 

Advertisement

(नक्की वाचा- Kalyan Crime : विशाल गवळीचा फास आणखी आवळला, 3 भावांवर पोलिसांची मोठी कारवाई)

हजारो लोकांनी गमावला जीव

7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासच्या हल्ल्यात 1,200 हून अधिक नागरिक मारले गेले आणि 250 हून अधिक लोकांना ओलीस ठेवण्यात आले. त्यापैकी सुमारे 100 अजूनही कैद आहेत. त्यानंतर प्रत्युत्तर म्हणून, इस्रायलने गाझा पट्टीतील हमासच्या ठिकाणांना लक्ष्य करत मोठा हल्ला केला. गाझा आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गाझामध्ये 45,000 हून अधिक लोक मारले गेले आहेत. 

Topics mentioned in this article