Israel Iran War: इस्रायल आणि इराणमधील युद्ध शिगेला पोहोचलेले असतानाच आता सोशल मीडियावर एका वेगळ्याच चर्चेने जोर धरला आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा एक नवा व्हिडीओ समोर आला असून, त्यामध्ये त्यांच्या हाताला सहा बोटे दिसत असल्याचा दावा केला जात आहे. या एका गोष्टीमुळे नेतन्याहू सध्या नेमके कुठे आहेत आणि तो व्हिडीओ खरा आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI द्वारे तयार केलेला आहे, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून ते सार्वजनिकरित्या न दिसल्याने त्यांच्या प्रकृतीबाबतही विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत.
काय आहे प्रकरण?
बेंजामिन नेतन्याहू यांनी शुक्रवारी त्यांच्या एक्स (ट्विटर) हँडलवरून एक व्हिडीओ शेअर केला होता. यामध्ये त्यांनी इराणविरुद्ध सुरू असलेल्या युद्धाबाबत भाष्य केले आहे. या युद्धाला आता 15 दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक युझर्सनी असा दावा केला की, त्यांच्या उजव्या हाताला सहा बोटे दिसत आहेत.
तंत्रज्ञानाच्या भाषेत सांगायचे तर, एखादा व्हिडीओ AI द्वारे बनवला जातो, तेव्हा अनेकदा हाताच्या बोटांमध्ये अशा तांत्रिक चुका (Glitches) पाहायला मिळतात. यामुळेच हा व्हिडीओ बनावट असल्याच्या संशयाने सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली आहे.
Last time I checked, humans usually dont have 6 fingers…. AI does.
— AustraliaFirstOnly (@gigabasedd) March 13, 2026
Is Netenyahu no more? pic.twitter.com/EUkIsKGmHR
תגיד ביבי, אתה כלכך מיוחד שיש לך 6 אצבעות או שאתה כבר מזמן לא איתנו? pic.twitter.com/Ax3OqaTuRT
— Yaron Zakai-Or (@yzakai) March 13, 2026
कॅन्डिस ओवेन्स यांनी विचारला प्रश्न
अमेरिकेतील प्रसिद्ध राजकीय विश्लेषक कॅन्डिस ओवेन्स यांनीही या वादात उडी घेतली आहे. त्यांनी एक्सवर पोस्ट करत थेट प्रश्न विचारला की, बीबी (नेतन्याहू यांचे टोपणनाव) नक्की कुठे आहेत? त्यांचे कार्यालय हे बनावट AI व्हिडीओ का शेअर करत आहे आणि त्यानंतर ते डिलीट का केले जात आहेत? तसेच व्हाईट हाऊसमध्ये यावरून एवढी अस्वस्थता का आहे, असे प्रश्न ओवेन्स यांनी उपस्थित केले आहेत. यामुळे नेतन्याहू यांच्या सुरक्षिततेबाबतच्या अफवांना अधिक बळ मिळाले आहे.
Washington D.C is lying to the American people about what is going on in Iran.
— Candace Owens (@RealCandaceO) March 14, 2026
It is not going well.
Also where is Bibi Netanyahu? Why is his office releasing and deleting fake AI videos from him and why is there mass panic at the White House?
काय आहे स्पष्टीकरण?
या सर्व गोंधळाच्या पार्श्वभूमीवर एक्स (ट्विटर) च्या ग्रेक (Grok) या एआय चॅटबॉटने महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. ग्रेकच्या मते, नेतन्याहू यांच्या हाताला सहा बोटे असल्याचा दावा पूर्णपणे चुकीचा आहे. तो केवळ एक दृष्टीभ्रम (Optical Illusion) आहे.
व्हिडीओमध्ये ज्या कोनातून हात दाखवला गेला आहे आणि त्यातील लाल वर्तुळामुळे तो हात वेगळा वाटत आहे. तसेच नेतन्याहू यांच्या मृत्यूच्या ज्या अफवा पसरवल्या जात आहेत, त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. स्नॅप्स आणि टाईम्स ऑफ इस्रायल सारख्या अधिकृत माध्यमांनी देखील या बातम्या फेटाळून लावल्या आहेत.
( नक्की वाचा : Pune News: पुणेकरांचे मोठे यश! महागड्या LPG ला रामराम; आता घरच्या घरी तयार होणार गॅस! वाचा काय आहे संशोधन )
कुटुंबाची शांतता आणि संशयास्पद हालचाली
केवळ व्हिडीओच नाही, तर इतर काही गोष्टींमुळेही संशय बळावला आहे. नेतन्याहू यांचा मुलगा यायर नेतन्याहू हा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो, मात्र 9 मार्च नंतर त्याने एकही पोस्ट केलेली नाही. दुसरीकडे, इस्रायलचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट एका पत्रकार परिषदेतून अचानक उठून गेले आणि थोड्या वेळाने परतले, ही घटनाही अनेकांना संशयास्पद वाटत आहे.
एनडीटीव्हीचे पत्रकार आदित्य राज कौल यांनी दिलेल्या माहितीनुसार, नेतन्याहू हे शेवटचे बीट शेमेश येथील ढिगाऱ्यांमध्ये चालताना दिसले होते. त्यानंतर ते सार्वजनिकरित्या समोर आलेले नाहीत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world