जाहिरात

मोबाइलच्या जगात हिजबुल्लाह का वापरत आहेत पेजर? स्फोट नेमके कसे झाले?

Lebanon Pager Attack: इस्रायलला आधीपासूनच माहिती होते की हिजबुल्लाहचे दहशतवादी संपर्कासाठी आता मोबाईलऐवजी पेजर वापरणार आहेत. त्यामुळे इस्रायलने पेजर तयार करतानाच त्यात स्फोटके लावली होती, असा दावा केला जात आहे.

लेबनान एका विचित्र हल्ल्यामुळे हादरलं आहे. स्पाय-थ्रिलर चित्रपटांमध्ये शोभेल असा हल्ला हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेवर करण्यात आला. मात्र या हल्ल्याच्या निमित्ताने दहशतवादी पेजर का वापरतात? असा सवाल समोर येत आहे.  मंगळवारी (17 सप्टेंबर) दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास लेबनानमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लहान लहान स्फोट झाले. स्फोट लहान होते मात्र त्यांची तीव्रता जास्त होती. या स्फोटात आतापर्यंत 9 जण दगावले असून 2700 हून अधिक जखमी झाले.  मोबाईलचा उदय होण्यापूर्वी भारतासह जगभरात पेजर मोठ्या प्रमाणावर वापरला जात होता. पेजरवर शॉर्ट मेसेज वाचण्याची सोय होती. मोबाईल जसजसा प्रगत होत गेला तसतसे पेजर्स लुप्त झाले. मग लेबनानमध्ये असे काय घडले की लोकांनी मोठ्या प्रमाणावर पेजर वापरायला सुरुवात केली ? असा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पेजर म्हणजे काय?

पेजर हे एक संपर्कासाठीचे खिशात मावेल इतके छोटे उपकरण आहे. याला बीपर्स असेही म्हणतात. पेजरवर मेसेज वाचता येतो. 1980 नंतर पुढची काही वर्ष पेजर मोठ्या प्रमाणात वापरला जात होता. पेजरला बीपर्स असंही म्हटलं जातं कारण मोबाईलमध्ये जशी रिंगटोन असते तशी पेजरमध्ये मेसेज आल्यानंतर एक बीप वाजते. पेजर म्हणजे काय हे नव्या पिढीला माहितीही नसताना लेबनानमधल्या हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेने ते वापरण्यास का सुरुवात केली असा प्रश्न पडतो.  पेजरवर मेसेज आल्यानंतर बीप वाजते आणि तो व्हायब्रेट होतो. शांत ठिकाणी तिथल्या शांततेचा भंग न करता मेसेज मिळवणे आणि वाचणे सोपे जाते. त्यामुळे कोणाचे त्याकडे लक्षही जात नाही.  

(नक्की वाचा -  लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या सदस्यांच्या पेजर्समध्ये स्फोट, 1000 हून जास्त जणं जखमी)

Latest and Breaking News on NDTV

कम्युनिकेशनसाठी नेटवर्कची गरज नाही

पेजरसाठी मोबाईलप्रमाणे नेटवर्कची गरज नसते.  सुरक्षा यंत्रणांच्या नजरेत न येता, संदेश पाठवणे पेजरमुळे शक्य होते. त्यामुळे यावर नजर ठेवणेही तितकेच कठीण असते. रेडिओ सिग्नलद्वारे मेसेज पाठवले जातात त्यामुळे त्यांचा माग काढणे कठीण होते. बंदिस्त जागी जिथे मोबाईलचे नेटवर्क येत नाही, फोनही लागत नाही, तिथेही पेजरवर मेसेज प्राप्त होऊ शकतात. जाड भिंतींच्या आड दडल्यानंतरही पेजरवर मेसेज मिळू शकतात.  पेजर एकदा चार्ज केल्यानंतर बरेच दिवस चालतो. पेजरच्या बॅटरीचा स्फोट हा तांत्रिक समस्यांमुळेच अथवा काहीतरी छेडछाड केली तरच होऊ शकतो. 

( नक्की वाचा : Vande Metro : देशातील पहिल्या 'वंदे मेट्रो'चं किती आहे तिकीट? काय आहे वेगळेपण? वाचा संपूर्ण माहिती )

पेजरमध्ये स्फोट कसे झाले?

मग हे स्फोट कसे झाले ? तर त्यामागे एक तर्क लावला जात आहे.  हल्ल्यामागे इस्रायल असल्याचं बोललं जात आहे. पेजरमध्ये जी बॅटरी वापरली जाते ती लिथिअमची असते. लिथिअमची बॅटरी वाहनांमध्येही वापरली जाते. लिथिअमची बॅटरी गरम झाली तर आग लागू शकते. ही बाब माहिती असल्याने इस्रायलने या पेजरमध्ये आधीपासूनच 10 ग्रॅम वजनाची स्फोटके लावून ठेवली होती. हिजबुल्लाच्या एका टॉपच्या नेत्याचा ड्रोन हल्ल्यात खात्मा केला होता. यासाठी इस्रायलने त्याच्या मोबाईलद्वारे मागोवा काढला होता. यापासून धडा घेत हिजबुल्लाहने मोबाईलऐवजी पेजरद्वारे संपर्क साधण्याचा निर्णय घेतला होता. 

Latest and Breaking News on NDTV

इस्रायलला आधीपासूनच माहिती होते की हिजबुल्लाहचे दहशतवादी संपर्कासाठी आता मोबाईलऐवजी पेजर वापरणार आहेत. त्यामुळे इस्रायलने पेजर तयार करतानाच त्यात स्फोटके लावली होती, असा दावा केला जात आहे. इस्रायलने मंगळवारी हे पेजर हॅक केले ज्यामुळे त्यांची बॅटरी गरम झाली आणि स्फोट झाले. असा आतापर्यंत दावा केला जात आहे. 

(नक्की वाचा- तुमचे रेकॉर्ड तपासा...", भारतीय मुस्लिमांबाबतच्या वक्तव्यावरुन भारताचं ईराणच्या सर्वोच्च नेत्याला प्रत्युत्तर)

तज्ज्ञांचं मत काय?

सायबर सेक्युरिटी तज्ज्ञ प्रशांत माळी यांना जेव्हा या घटनेबाबत विचारलं तेव्हा त्यांनी सांगितले की, या हल्ल्यासाठी स्फोटके अशी वापरली होती की ज्याचा माग काढणं अवघड होतं. स्फोटकांची मात्राही अगदी कमी वापरण्यात आली होती. पेजरमध्ये उपकरणांच्या चाचणी किंवा तपासणीमध्ये पेजरमध्ये स्फोटके कशी बसवली हे कळणं अवघड आहे. या सारखे अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
PM Modi Birthday : पंतप्रधान मोदींना मेलोनींनी दिल्या शुभेच्छा, वाढदिवशी दिलं वचन
मोबाइलच्या जगात हिजबुल्लाह का वापरत आहेत पेजर? स्फोट नेमके कसे झाले?
india-seeks-review-of-indus-water-treaty-send-notice-to-pakistan
Next Article
पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी पाकिस्तानला मोजावी लागेल किंमत, 64 वर्ष जुन्या कराराबाबत भारताचा निर्णय