जाहिरात

मॉरिशसमध्ये नेमकं काय घडतंय? 'महाराष्ट्र भवना'चा विस्तार आणि सावरकरांच्या नावाने नवा इतिहास! वाचा सविस्तर

महाराष्ट्र आणि मॉरिशस या दोन प्रदेशांमधील मैत्रीचे नाते केवळ राजनैतिक नसून ते पिढ्यानपिढ्यांच्या रक्ताच्या नात्यासारखे आहे.

मॉरिशसमध्ये नेमकं काय घडतंय? 'महाराष्ट्र भवना'चा विस्तार आणि सावरकरांच्या नावाने नवा इतिहास! वाचा सविस्तर
मॉरिशसमधील मोका येथे ‘महाराष्ट्र भवनाच्या’ विस्तारित वास्तूचा पायाभरणी सोहळा चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच पार पडला
मुंबई:


महाराष्ट्र आणि मॉरिशस या दोन प्रदेशांमधील मैत्रीचे नाते केवळ राजनैतिक नसून ते पिढ्यानपिढ्यांच्या रक्ताच्या नात्यासारखे आहे. सातासमुद्रापार राहूनही येथील मराठी जनसमुदायाने आपली सांस्कृतिक मुळे आणि मराठी भाषा ज्या अभिमानाने जपली आहे, ते कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले. मॉरिशसमधील मोका येथे ‘महाराष्ट्र भवनाच्या' विस्तारित वास्तूचा पायाभरणी सोहळा चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच पार पडला. या विस्तारित वास्तूसाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष रस दाखवत 8 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. या निधीतून आता ही वास्तू अधिक भव्य स्वरूप धारण करणार आहे. विशेष म्हणजे, या नूतन वास्तूतील मुख्य सभागृहाला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर' यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, स्थानिक मराठी बांधवांनी या प्रस्तावाचे उत्स्फूर्त स्वागत केले.

‘एआय' आणि तंत्रज्ञानावर चर्चा

आपल्या दोन दिवसांच्या दौऱ्यात रविंद्र चव्हाण यांनी मॉरिशसचे राष्ट्राध्यक्ष धरमबीर गोखुल यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत केवळ सांस्कृतिकच नव्हे, तर आर्थिक आणि तंत्रज्ञानविषयक मुद्द्यांवरही चर्चा झाली. ब्ल्यू इकॉनॉमी, पर्यटन, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) आणि सायबर सुरक्षा या क्षेत्रांत भारत आणि मॉरिशस कसे एकत्र काम करू शकतात, यावर या बैठकीत भर देण्यात आला. "मॉरिशस हा भारताचा धाकटा भाऊ आहे," असे उद्गार तिथल्या राष्ट्राध्यक्षांनी काढले.

( नक्की वाचा : Amravati News : महिन्याला मिळायचे फक्त 150 रुपये, आज 15 कोटींची उलाढाल! अमरावतीच्या शेतकऱ्याला 'ऑक्सफर्ड'मधून बोलावणं )
 

पुण्यातील आठवणींना उजाळा

मॉरिशसचे आयटी मंत्री डॉ. अविनाश रामतोहूल यांनी चव्हाण यांच्याशी संवाद साधताना आपल्या फर्ग्युसन कॉलेजमधील (पुणे) शिक्षणाच्या आठवणींना उजाळा दिला. महाराष्ट्रातील रेशनिंग व्यवस्थेत जीपीएस तंत्रज्ञानाचा वापर करून आणलेल्या पारदर्शकतेचे त्यांनी विशेष कौतुक केले. मॉरिशसला आफ्रिका खंडासाठी ‘एआय गेटवे' बनवण्यासाठी भारताचे सहकार्य मोलाचे ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Latest and Breaking News on NDTV

सांस्कृतिक संस्थांना बळ

या दौऱ्यात चव्हाण यांनी केवळ शासकीय भेटीगाठी न घेता, स्थानिक मराठी संस्थांशीही संवाद साधला. मेलरोझ श्री गजानन सरस्वती मंदिर, विठोबा रखुमाई मराठा मंदिर, आणि पाल्मा मराठी सभा यांसारख्या विविध संस्थांना महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागामार्फत अनुदानाचे धनादेश सुपूर्द करण्यात आले. ‘महा गणेशोत्सव 2025' च्या तयारीसाठीही विशेष सहकार्य जाहीर करण्यात आले. यावेळी मॉरिशसचे खासदार अर्विन बाबाजी, मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशनचे अध्यक्ष बलराज नारू, धनीराव भिवाजी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com