- ऑस्ट्रिया के कलाकार गुस्ताव क्लिम्ट की पेंटिंग न्यूयॉर्क में दो हजार करोड़ रुपए से अधिक में बिकी
- पेंटिंग का नाम एलिजाबेथ लेडरर का पोर्ट्रेट है, जो क्लिम्ट के प्रमुख संरक्षक की बेटी का तस्वीर है
- यह पेंटिंग 1914 से 1916 के बीच बनाई गई थी और आज तक की किसी भी नीलामी में दूसरी सबसे महंगी पेंटिंग बनी
Most Expensive Painting: कला विश्वात एका मोठ्या इतिहासाची नोंद करणारी एक घटना नुकतीच घडली आहे. ऑस्ट्रियन चित्रकार गुस्ताव क्लिम्त (Gustav Klimt) यांनी 1914 ते 1916 दरम्यान रेखाटलेले 'पोर्ट्रेट ऑफ एलिझाबेथ लेडरर' हे प्रसिद्ध पेंटिंग न्यूयॉर्क येथील लिलावात $236.4 मिलियन म्हणजेच सुमारे 2087 कोटी रुपयांना विकले गेले आहे.
या विक्रीमुळे पेंटिंग लिलावात विकली गेलेली जगातील दुसरी सर्वात महागडी कलाकृती ठरली आहे. तसेच आधुनिक कलेच्या श्रेणीतील हे सर्वात महागडे पेंटिंग ठरले आहे. हा लिलाव 20 मिनिटांपर्यंत चालला. ज्यात सहा बोलीदारांनी पेंटिंग मिळवण्यासाठी तीव्र संघर्ष केला. मात्र, हे पेंटिंग खरेदी करणाऱ्या व्यक्तीची ओळख गुप्त ठेवली आहे.
(नक्की वाचा- Solapur-Akkalkot Highway: सोलापूर-अक्कलकोट मार्गावर कशी होतेय फसवणूक? हा Video बघाच; कमेंट्सही नक्की वाचा)
पेंटिंगचं वर्णन आणि वेशिष्ट्य
हे पेंटिंग सुमारे सहा फूट उंचीचे असून, त्यात क्लिम्तच्या आश्रयदात्यांपैकी एकाची मुलगी एलिझाबेथ लेडरर हिला चिनी वेशभूषेत दाखवले आहे. हे पेंटिंग व्हिएन्नाच्या सुवर्णयुगात तयार झाले. Sotheby's च्या अधिकृत वेबसाइटनुसार, हे पेंटिंग शक्ती, सौंदर्याचं प्रतिक आहे.
या पेंटिंगच्या विक्रीच्या किमतीप्रमाणेच त्याचा इतिहासही खूप रोचक आहे. दुसऱ्या महायुद्धादरम्यान नाझींनी ही कलाकृती जप्त केली होती. पेंटिंग ठेवलेल्या इमारतीला आग लागल्यामुळे ते जवळपास नष्ट होण्याच्या मार्गावर होते. मात्र, ते चमत्कारिकरित्य सुस्थितीत राहिले आणि नंतर ते कलाकार क्लिम्तचा भाऊ एरिक याला परत मिळाले.
(नक्की वाचा- Pune News: "साहेब माझी मजबुरी आहे...", पुण्यातील तरुणाचा VIDEO व्हायरल, चूक कुणाची सांगा?)
सध्या मालकी कुणाकडे?
1983 मध्ये एरिकने हे पोर्ट्रेट विकण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर हे पेंटिंग लिओनार्ड ए लाउडर यांच्याकडे आले, जे एस्टी लाउडरचे वारसदार होते. लाउडर यांनी हे पेंटिंग त्यांच्या न्यूयॉर्कमधील घरी ठेवले होते आणि ते अधूनमधून गॅलरींमध्ये प्रदर्शनासाठी देत असत. यावर्षी जून मध्ये लाउडर यांचे निधन झाले आणि त्यानंतर हे पोर्ट्रेट पुन्हा लिलावासाठी उपलब्ध झाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world