Palghar News : महिला जिथं आधार घ्यायला गेली त्यांनीच तिचा घात केल्याचा धक्कादायक प्रकार पालघरमधून उघडकीस आला आहे. ही महिला पतीपासून स्वत:चा बचाव करीत पालघर मनोरजवळील वारली हाट कला दालन प्रकल्पात लपून बसली होती. येथेच नराधमाने तिच्यावर झडप घातली अन् तोंड दाबून तिच्यावर अत्याचार केल्याचा भयंकर प्रकार समोर आल्याने जिल्ह्यातून संताप व्यक्त केला जात आहे.
चुलत सासऱ्यानेच केला अत्याचार
पालघरच्या मनोर जवळील वारली हाट कला दालन प्रकल्पात अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पती-पत्नीतील वादातून एक महिला जिथं आधार घ्यायला गेली, तिथंच तिच्यावर अत्याचार करण्यात आले. या पती-पत्नीमध्ये वाद झाला होता. पती मारहाण करेल या भीतीने महिला रात्रीच्या वेळी घराशेजारील वारली हाट कला दालन प्रकल्पात लपून बसली. दिल्ली हाटच्या धर्तीवर वारली हाट कला दालनाची संकल्पाना आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून हे दालन रखडलं आहे. येथील वॉचमनने महिलेवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे.
तिचं तोंड दाबून नराधम शरीराचे लचके तोडत राहीला
पीडित महिला आरडाओरडा करण्याचा प्रयत्न करत असताना आरोपीने तिचे तोंड दाबून ठेवले. अत्याचारानंतर हा प्रकार कुणाला सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकीही आरोपीने दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, लैंगिक अत्याचार करणारा आरोपी हा पीडित महिलेचा चुलत सासरा असल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास मनोर पोलीस करत असून परिसरात खळबळ उडाली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
