रेवती हिंगवे, पुणे
Pune VIral Video: वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास दंड आकारणे आणि आवश्यक असल्यास कठोर कारवाई करणे हे पोलिसांचे कर्तव्य आहे. मात्र, पुण्यात नुकत्याच घडलेल्या घटनेने एका तरुणाने वाहतूक पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्न उभे केले आहे. ट्रिपल सीट दुचाकी चालवल्याबद्दल एका तरुणावर कारवाई करत ड्रायव्हिंग लायसन्स पोलिसांनी जप्त केले. या घटनेनंतर तरुणाने पोलिसांनी दिलेल्या वागणुकीबद्दल सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात हा तरुण आणि त्याचे दोन मित्र ट्रिपल सीट दुचाकीवरून प्रवास करत होते. वाहतूक पोलिसांनी त्यांना थांबवले आणि नियमानुसार ट्रिपल सीटसाठी 1000 रुपयांचा दंड आकारला. दंड भरणे तरुणाला मान्य होते. चूक झाल्याने तरुणाने कबूल केले. वाहतूक पोलिसांनी त्याच्याकडून त्याचे ड्रायव्हिंग लायसन्स घेतले आणि ते जप्त केले.
पाहा- VIDEO
(नक्की वाचा- Pimpri Chinchwad News: 'महिलांसाठी 30 कोटींचे कर्ज द्या!' पिंपरी-चिंचवडच्या नेत्याची थेट जागतिक बँकेकडे मागणी)
तरुणाने व्हिडीओमध्ये म्हटलं की, मला मान्य आहे माझी चूक झाली. पण लायसन्स घेतल्यावर त्यांनी मला माणूस म्हणून वागवलंच नाही. मी माझी अडचण, माझी परिस्थिती सांगत त्यांच्या मागे बरंच धावत होतो. पण साहेबांनी माझ्याकडे लक्ष दिले नाही. जणू मी भीक मागतोय आणि ते दुर्लक्ष करून निघून गेले."
(नक्की वाचा- Solapur-Akkalkot Highway: सोलापूर-अक्कलकोट मार्गावर कशी होतेय फसवणूक? हा Video बघाच; कमेंट्सही नक्की वाचा)
हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, अनेक नेटकरी तरुणाच्या बाजूने उभे राहिले आहेत आणि त्यांनी पोलिसांच्या वर्तनावर संताप व्यक्त केला आहे. कायद्याचे पालन जितके महत्त्वाचे आहे, तितकीच नागरिकांना आदराने वागणूक देणेही आवश्यक आहे, असे मत व्यक्त होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world