
Myanmar Earthquake : म्यानमारमधील भीषण भूकंपामुळे मृत पावणाऱ्यांची संख्या 1644 पर्यंत पोहोचली आहे. आतापर्यंत आलेल्या माहितीनुसार, तब्बल 3,408 जण जखमी आहेत. शुक्रवारी मध्य म्यानमारमधील सागाइंग शहरातील उत्तर-पश्चिममध्ये आलेल्या 7.7 तीव्रतेच्या भूकंपामुळे देशात मोठा हाहाकार उडाला. या भूकंपामुळे देशाची सांस्कृतिक राजधानी मांडलेमध्ये मोठ्या संख्येने इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
म्यानमार भूकंपामधील परिस्थिती बिकट होत चालली आहे. रेस्क्यू टीम सतत बचावकार्य करीत लोकांना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. इमारतींच्या ढिगाऱ्याखालून लोकांना बाहेर काढलं जात आहे. म्यानमारवर आलेल्या या दैवी संकटामुळे जगभरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. यादरम्यान एक्सचे मालक एलॉन मस्क यांनीही मदतीने हात दिला आहे.
नक्की वाचा - Myanmar Earthquake VIDEO : थायलंड, म्यानमार शक्तीशाली भूकंपाने हादरले; इमारती, पूल कोसळले, 20 जणांचा
म्यानमारमध्ये आलेल्या अत्यंत शक्तिशाली भूकंपाच्या झटक्यामुळे थायलँडची राजधानी बँकॉकही उद्ध्वस्त झालं. या भूकंपामुळे बँकॉकमधील दहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर 16 जखमी आणि 101 जण अद्यापही बेपत्ता आहेत. भारताने शनिवारी म्यानमारला मदत पोहोचवली आहे. आपत्कालिन मिशन ऑपरेशन ब्रम्हाच्या अंतर्गत हवाई आणि समुद्री मार्गाने मदत साहित्य पाठविण्यात आलं आहे.
थायलंडमध्ये झालेल्या भूकंपाच्या वेळी एका महिलेने बँकॉकमधील पोलीस जनरल रुग्णालयाच्या बाहेर रस्त्यावर एका मुलाला जन्म दिला. शुक्रवारी भूकंप झाला तेव्हा महिलेवर शस्त्रक्रिया सुरू होती आणि डॉक्टरांना रुग्णालय रिकामं करावं लागलं. त्यानंतर महिलेची रस्त्यावरच डिलिव्हरी झाली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world