
- दिल्ली-NCR में रविवार रात करीब 12:55 बजे भूकंप के झटके महसूस किए गए, जिससे लोग अचानक चिंता में आ गए.
- यूरोपियन मेडिटेरेनियन सिस्मोलॉजिकल सेंटर के अनुसार भूकंप का केंद्र अफगानिस्तान में होने की संभावना जताई गई.
- स्थानीय लोगों ने सोशल मीडिया पर भूकंप के झटकों का अपना अनुभव साझा किया. जानमाल के नुकसान की खबर नहीं है.
Earthquake in Afghanistan : दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारताच्या काही भागांमध्ये रविवारी रात्री उशीरा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. युरोपियन-मेडिटेरेनियन सीस्मोलॉजिकल सेंटरच्या माहितीनुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानात होता. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत अफगाणिस्तानात 9 जणांचा मृत्यू झाला आहे.
रविवार रात्री सुमारे 12:55 वाजता दिल्ली-एनसीआर आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. सुरुवातीला भूकंपाचा केंद्रबिंदू पाकिस्तानमध्ये असण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र नंतर तो अफगाणिस्तानात असल्याची पुष्टी झाली. यामुळे घाबरलेल्या लोकांनी सोशल मीडियावर आपले अनुभव शेअर केले.
(नक्की वाचा - मोठा पेच! मराठा समाजाला ‘सरसकट कुणबी' संबोधण्यास हायकोर्ट- सुप्रीम कोर्टाचा सपशेल नकार)
6.2 रिश्टर स्केलची तीव्रता
जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसायन्सेसनुसार, अफगाणिस्तानच्या दक्षिण-पूर्व भागात रिश्टर स्केलवर 6.2 तीव्रतेचा भूकंप आला. जर्मन संस्थेने या भूकंपाची खोली 10 किलोमीटर होती असे सांगितले, तर ईएमएससीनुसार याची खोली सुमारे 35 किलोमीटर होती.
या भूकंपाचे धक्के अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारतातील काही भागांमध्ये, दिल्ली-एनसीआर क्षेत्रात जाणवले. भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिक घाबरले आणि घराबाहेर पडले. मात्र कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही ही दिलासादायक बाब आहे.
(Manoj Jarange Patil Maratha Morcha : मराठा आंदोलनादरम्यान हळहळ! आणखी एका मराठा बांधवाचा मृत्यू)
जगभरात भूकंपाच्या घटनांमध्ये वाढ
अलीकडच्या काळात जगभरात भूकंपाच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या महिन्यातच, रशियाच्या कुरिल द्वीपसमूहाच्या पूर्वेला 6.0 तीव्रतेचा भूकंप आला होता. त्याची खोली 10 किलोमीटर होती, असे ईएमएससीने सांगितले. त्याचप्रमाणे, 30 जुलै रोजी रशियाच्या कामचटका द्वीपकल्पाच्या पूर्व किनाऱ्यावर 8.8 तीव्रतेचा एक अतिशय शक्तिशाली भूकंप आला होता. ज्यामुळे अधिकाऱ्यांनी देशाच्या काही भागात त्सुनामीची चेतावणी जारी केली होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world