नेपाळमधील मुसळधार पावसामुळे (Nepal Floods and Landslides) पूर आणि भूस्खलनमधील मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रविवारी मृतांचा आकडा 170 पर्यंत पोहोचला असून 42 जणं अद्यापही बेपत्ता आहे. अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली. शुक्रवारी पूर्व आणि मध्य नेपाळमधील अनेक भागात पाणी साचलं होतं. यामुळे देशातील अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. (Nepal News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेपाळमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत 170 जणांचा मृत्यू झाला आहे. गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनुसार, पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत 42 जण बेपत्ता झाले आहेत. गृह मंत्रालयाचे प्रवक्ता ऋषिराम पोखरेल यांनी सांगितलं की, पूरासंबंधित घटनांमध्ये 111 जणं जखमी झाले आहेत. पोरखेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा एजन्सीच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. त्यांनी सांगितलं की, नेपाळी सैन्याने देशभरातील अडकलेल्या 162 लोकांना हवाई मार्गाने बाहेर काढलं आहे.
पोखरेल यांनी सांगितलं की, पूर आणि ठिकठिकाणी पाणी साचल्याने तब्बल चार हजार लोकांना नेपाळी सैन्य, नेपाळ पोलीस आणि सशस्त्र पोलीस दलाच्या जवानांनी वाचवलं आहे. त्यांना खाण्या-पिण्याच्या गोष्टींसह सर्व आवश्यक साहित्य पुरविण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरामुळे नेपाळमधील कमीत कमी 322 घर आणि 16 पूल उद्ध्वस्त झाले आहेत. गेल्या 40 ते 45 वर्षात काठमांडू घाटीत पावसाचा असा प्रकोप पाहायला मिळाला नाही. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, शनिवारी काठमांडूच्या सीमेलगतच्या धादिंग जिल्ह्यात भूस्खलनामुळे बस गाडली गेल्याने कमीत कमी 19 जणांचा मृत्यू झाला आहे.
नक्की वाचा - महिलेचे 59 तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवणाऱ्या मुख्य आरोपीचाही धक्कादायक शेवट, दुचाकीशेजारी आढळला...
याबाबत वैज्ञानिकांनी सांगितलं की, हवामान बदलामुळे संपूर्ण आशियात पावसामुळे मोठे बदल पाहायला मिळत आहेत. मात्र शहरामधील अनियोजित बांधकामामुळे पूरपरिस्थिती उद्भवल्याचं सांगितलं जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world