
Night Club Roof Collapse : डोमिनिकन रिपब्लिकमधील एका नाईट क्लबमध्ये छत कोसळून मोठा दुर्घटना घडली आहे. देशाची राजधानी सॅंटो डोमिंगो येथील प्रसिद्ध जेट सेट डिस्कोथेकमध्ये हा अपघात झाला. प्रसिद्ध गायिका रुबी पेरेझच्या संगीत कार्यक्रमादरम्यान नाईट क्लबचे छत अचानक कोसळले. या अपघातात सुमारे 79 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 150 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये प्रसिद्ध गायक, मोंटे क्रिस्टी प्रांताचे गव्हर्नर आणि माजी मेजर लीग बेसबॉल पिचर ऑक्टाव्हियो डोटेल यांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जेट सेट नाईट क्लबमध्ये ही दुर्घटना घडली. बचाव पथके ढिगाऱ्याखाली दबलेल्या नागरिकांचा शोध घेत आहेत. नाईट क्लबचे छत कोसळल्यानंतर जवळपास 12 तास उलटूनही, बचाव पथके ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना जिवंत बाहेर काढत आहेत. अग्निशामक दल आणि बचाव पथके नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत.
🚨🇩🇴13 DEAD, 93 INJURED IN NIGHTCLUB ROOF COLLAPSE IN THE DOMINICAN REPUBLIC
— Mario Nawfal (@MarioNawfal) April 8, 2025
This comes after the roof of the Jet Set nightclub in Santo Domingo, Dominican Republic, collapsed earlier this morning.
The national police confirmed the death toll and said search and rescue… pic.twitter.com/yAdkTqw8yX
नाईट क्लबचे छत कसे कोसळले याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. जेट सेट इमारतीची शेवटची तपासणी कधी करण्यात आली होती, याची चौकशी अधिकारी करत आहेत. दरम्यान, क्लबने एक निवेदन जारी केले आहे. क्लबने म्हटले आहे की, अपघात झाला तेव्हा क्लबचे मालक अँटोनियो एस्पेलॅट देशात नव्हते. अपघाताची माहिती मिळताच तो मंगळवारी रात्री उशिरा परतले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world