VIDEO : पाकिस्तान्यांची चिंधीगिरी, लोकांनी उद्धाटनाच्या दिवशीच अर्ध्या तासात लुटला मॉल  

गर्दीला नियंत्रित करण्यासाठी दुकानाचे दरवाजे बंद केले. मात्र लोकांना दरवाजाच्या काचा फोडून दुकानात प्रवेश केला. दुसऱ्या एका व्हिडीओ दोन व्यक्ती दुकानाबाहेरील गर्दी नियंत्रित करण्यातसाठी बाबूंच्या साहाय्याने लोकांना दूर करण्याचा प्रयत्न झाला.

जाहिरात
Read Time: 2 mins

पाकिस्तानातील कराची येथे उद्घाटनाच्या दिवशीच एक शॉपिंग मॉल लुटला गेल्याची घटना समोर आली आहे. ड्रीम बाजार' नावाच्या स्टोअरच्या उद्घाटनाचं सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार प्रमोशन करण्यात आलं होतं. या दुकानातील प्रत्येक वस्तूची किंमत पाकिस्तानच्या 50 रुपयांपेक्षा कमी होती. एवढी कमी किंमत असूनही पाकिस्तानातील लोकांना ती परवडत नव्हती की काय, म्हणून पाकिस्तान्यांनी अवघ्या 30 मिनिटात हे दुकान लुटलं. 

ड्रीम बाजार मॉलचा सोशल मीडियावर जोरदार प्रचार करण्यात आला होता. तेथे लोकांना कपडे, इलेक्ट्रिक उपकरणे आणि घरगुती वस्तू अगदी वाजवी दरात  मिळणार होत्या. अनेक वस्तू  स्वस्तात मिळणार असल्याने उद्घाटनच्या दिवशीच हजारो लोकांचा जमाव दुकानाबाहेर जमला होता. या गर्दीवर नियंत्रण ठेवणे दुकान व्यवस्थापनाला शक्य झाले नाही. काही वेळातच शेकडो लोकांची गर्दी दुकानात शिरली. 

(नक्की वचा - ट्रेनमध्ये वृद्ध तरुणाला मारहाणप्रकरणी तिघांना अटक, पोलीस भरतील आले होते तरुण)

या घटनेचे अनेक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. गर्दीला नियंत्रित करण्यासाठी दुकानाचे दरवाजे बंद केले. मात्र लोकांना दरवाजाच्या काचा फोडून दुकानात प्रवेश केला. दुसऱ्या एका व्हिडीओ दोन व्यक्ती दुकानाबाहेरील गर्दी नियंत्रित करण्यातसाठी बाबूंच्या साहाय्याने लोकांना दूर करण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसलं. दुकानाबाहेरील परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की यामुळे शहरातील वाहतूक देखील काही वेळ ठप्प झाली. दुकानाबाहेर एकही पोलीस कर्मचारी उपस्थित नसल्याचा आरोप काही लोकांनी केला.

Advertisement

(नक्की वाचा-  भयंकर दुष्काळामुळे उपासमारीची वेळ; हत्ती, पाणघोडे मारून लोकांची भूक भागवण्याचा निर्णय)

दुकान मालकाने सांगितले की, आम्ही 3 वाजता दुकान उघडले आणि 3.30 पर्यंत दुकानातील सर्व सामान चोरीला गेले. आम्ही हे स्टोअर कराचीच्या लोकांच्या फायद्यासाठी उघडले. वर्षभर वस्तूंच्या किमती त्याच राहणार होत्या. पण आम्हाला चांगल्या ओपनिंगऐवजी गोंधळाला सामोरे जावे लागले. आम्ही मेहनत करुन हे दुकाना उघडलं होतं. आम्ही आमच्या कुटुंबियांपेक्षा जास्त वेळ इथे दिला. मात्र लोकांना आम्हाला अशी वागणूक दिली. पाकिस्तानात खूप कमी जण गुंतवणूक करत आहेत. लोकांच्या हितासाठी जर कुणी काही गुंतवणूक करत तर ते लोकांनी समजून घेतलं पाहिजे. 

Topics mentioned in this article