जाहिरात

PM Modi Meets Trump : टॅरिफ ते दहशतवाद; पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्या भेटीत कोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीमध्ये कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली?

PM Modi Meets Trump : टॅरिफ ते दहशतवाद; पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्या भेटीत कोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा?

Narendra Modi US Visit Update : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी रात्री उशीरा (भारतीय वेळेनुसार सकाळी 3 वाजता) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची व्हाइट हाइसमध्ये भेट घेतली. ट्रम्प यांनी टॅरिफ प्रकरणावर मोदींचं कौतुक केलं. मोदींचं वाटाघाटीचं तंत्र जबरदस्त असल्याचं म्हटलं. मोदी माझे चांगले मित्र असून ते चांगलं काम करीत असल्याचंही ट्रम्प म्हणाले. ट्रम्प यांनी भारताला F-35 फायटर जेट देण्याची घोषणा केली. यासोबतच त्यांनी 2008 मध्ये मुंबई हल्ल्यातील दहशतवादी तहव्वुर राणा याला भारताला सोपवणार असल्याचं सांगितलं. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नरेंद्र मोदींनी ट्रम्प यांचं अभिनंदन केलं. ट्रम्प यांच्यासह दुसऱ्यांदा काम करण्याची संधी मिळाली याचा आनंद आहे, अशीही भावना त्यांनी व्यक्त केली. 

AI मुळे नोकऱ्या जाणार नाहीत तर मिळणार! PM मोदींनी जगाला समजावून सांगितलं

नक्की वाचा - AI मुळे नोकऱ्या जाणार नाहीत तर मिळणार! PM मोदींनी जगाला समजावून सांगितलं

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या भाषणातील पाच महत्त्वाचे मुद्दे...

  • मुंबई हल्ल्याचा आरोपी तहव्वूर राणा याला भारताला सोपविण्यात येईल. 
  • इस्लामिक दहशतवादाविरोधात एकत्रितपणे लढू
  • आशिया पॅसिफिकसाठी भारताची महत्त्वपूर्ण भूमिका
  • भारतासह डिफेन्स बिजनेस अधिक वाढविणार
  • भारताला तेल आणि ऊर्जा सप्लाय करण्यावर सहमती
  • AI विकसित करण्यासाठी एकत्र मिळून काम करणार
  • भारतासोबतची व्यापार तूट कमी करण्यास अमेरिकेची सहमती

पीएम मोदींच्या भाषणातील पाच महत्त्वाचे मुद्दे...

  • अमेरिकन भाषेत विकसित भारत म्हणजे मेक इंडिया ग्रेट अगेन
  • ऊर्जा आणि पायाभूत सुविक्षा यातील गुंतवणूक वाढवणार
  • AI, सेमीकंडक्टर आणि क्वांटमवर मिळून काम करणार
  • न्यूक्लियर स्मॉल मॉड्यूलर रिअॅक्टर तयार करण्यासाठी सहकार्य करणार
  • लॉस एन्जलिस आणि बॉस्टनमध्ये नवे कॉन्सुलेट सुरू करणार


एकत्रितपणे घेतलेल्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाच्या घडामोडी...

यावेळी ट्रम्प म्हणाले, टॅरिफच्या मुद्द्यावर या भेटीत प्रत्येक बाजूने चर्चा करण्यात आली. आम्ही भारतासह धोरणात्मक भागीदारी वाढवत आहोत. भारताकडून 70 टक्के टॅरिफ लावला जातो. दहशतवाद कमी करण्यासाठी भारतासोबत मिळून काम करणार. 

ट्रम्प यांना विचारण्यात आलं की, जर तुम्ही भारताविरोधात कडक भूमिका घेतली तर चीनला कसं हरवू शकाल? यावर ते म्हणाले, आम्ही कोणालाही हरवू शकतो. मात्र आम्ही कोणालाही हरवण्याबद्दल विचार करीत नाही. आम्हाला चांगलं काम करायचं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी युक्रेन युद्धाबद्दल म्हणाले, जगाला वाटतं की भारत तटस्थ आहे. मात्र भारत तटस्थ नाही. भारताची स्वत:ची एक बाजू आहे ज्यात शांतता महत्त्वाची आहे. कोणत्याही समस्यांचं उत्तर युद्धातून मिळत नाही. त्यासाठी एकत्र येऊन चर्चा करायला हवी. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी पुढाकार घेतला आहे, मी त्याचं समर्थन करतो.