जाहिरात

PM Modi and Trump Meet : भारत-अमेरिकेमध्ये कोणत्या 5 मुद्द्यांवर झाली डिल? मोदी-ट्रम्प भेटीत नेमकं काय ठरलं?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिकेत व्हाइट हाऊसमध्ये भेट झाली. उत्साहाने दोघांनी एकमेकांची भेट घेतली.

PM Modi and Trump Meet : भारत-अमेरिकेमध्ये कोणत्या 5 मुद्द्यांवर झाली डिल? मोदी-ट्रम्प भेटीत नेमकं काय ठरलं?
Narendra Modi and Donald Trump meet : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिकेत व्हाइट हाऊसमध्ये भेट झाली. उत्साहाने दोघांनी एकमेकांची भेट घेतली. या भेटीदरम्यान दोघांनी आपआपल्या देशाच्या हितासाठी काही निर्णय घेतले. या भेटीदरम्यान पीएम मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षांना MIGA चा अर्थ समजावला. यावेळी मोदी म्हणाले, भारत आणि अमेरिकेता जेव्हा एकत्र काम करतात तेव्हा MAGA+MIGA तयार होतो. (MAGA - Make America Great again) (MIGA - Make India Great again)
मोदी-ट्रम्प यांच्या भेटीदरम्यान पाच मुद्द्यांवर चर्चा
व्यापार..
  • द्विपक्षीय व्यापाराला 2030 पर्यंत दुपट्टीने अधिक वाढवून 500 बिलियन डॉलरपर्यंत पोहोचविण्याचं ध्येय 
  • लवकरच आमची टीम परस्पर फायदेशीर व्यापार करार त्वरीत पूर्ण करण्यासाठी काम करेल
  • भारताच्या सुरक्षेचा विचार करता तेल आणि वायू ट्रेडमध्ये गती आणणे
  • ऊर्जा इन्फ्रास्टक्चरमध्ये गुंतवणूक वाढवणार
  • न्यूक्लियर ऊर्जा भागात स्मॉल मॉड्यूवरसाठी सहकार्य

PM Modi Meets Trump : टॅरिफ ते दहशतवाद; पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्या भेटीत कोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा?

नक्की वाचा - PM Modi Meets Trump : टॅरिफ ते दहशतवाद; पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्या भेटीत कोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा?

सुरक्षा...
  • संरक्षणाच्या तयारीत अमेरिकेची महत्त्वपूर्ण भूमिका. एकत्रित विकास आणि एकत्रितपणे निर्मिती, वाहतूक, तंत्रज्ञान वाढविण्यासाठी एक पाऊल 
  • येणाऱ्या काळात तंत्रज्ञान आणि इक्विमेंट क्षमता वाढवणार
  • ऑटोनोमस प्रणाली क्षेत्रात अलायन्स लॉन्च करण्याचा निर्णय
  • 21 शतकाची तयारी...
  • भारत आणि अमेरिका AI, सेमीकंडक्टर, बायोटेक्नॉलॉजी, क्वांटममध्ये मिळून काम करणार
  • TRUST (ट्रांसफॉर्मिंग रिलेशनशिप यूटिलाइजिंग स्ट्रॅजिक टेक्नॉलजी) वर एकमत
अंतराळ...
  • ISRO आणि NASA यांच्या सहकार्याने तयार केलेला NISAR उपग्रह लवकरच भारतीय प्रक्षेपण वाहनातून अवकाशात झेपावेल.
  • इंडो-पॅसिफिकमध्ये शांतता, स्थिरता आणि समृद्धी वाढवण्यासाठी आम्ही एकत्र काम करू.
  • क्वॉडची भूमिका महत्त्वाची असेल. भारतात क्वॉड समिटमध्ये मित्र देश आणि नव्या देशांसह सहकार्य वाढवणार
दहशतवाद...
  • अमेरिका आणि भारत दोघे दहशतवादाविरोधात एकत्र उभे राहतील
  • सीमेजवळील दहशतवादावर ठोस कारवाई करण्यात येणार
  • 2008 मध्ये मुंबई हल्ल्यातील दहशतवादी तहव्वुर राणा याला भारताला सोपवणार 
  • अमेरिकेत राहणारे भारतीय समुदाय भारतासाठी महत्त्वाचा आहे. लोकांशी संबंध अधिक दृढ करण्यासाठी लवकरच लॉस एन्जलिस आणि बॉस्टनमध्ये नवे काऊन्सलेट सुरू करणार
टॅरिफ कपात...
  • PM मोदींनी अलीकडेच भारतातील अनुचित, अतिशय मजबूत टॅरिफमध्ये कपात करण्याची घोषणा 
  • भारतीय बाजारपेठेतील यूएस प्रवेशावर फारच मर्यादा येतात आणि ही खरोखर एक मोठी समस्या
  • भारतातील अनेक वस्तुंवर 30-40 पासून 60-70 टक्के टॅरिफ लावला
  • उदा. अमेरिकेच्या कारवर 70 टक्के टॅफिर लावला जातो. ज्यामुळे या वाहनांची विक्री करणं कठीण झालं आहे. आज भारतासह अमेरिकेसोबत व्यापारातील नुकसान तब्बल 100 अरब डॉलर आहे.