NDTV World Summit : 'दुटप्पीपणा हा सौम्य शब्द आहे,' कॅनडाच्या धोरणावर परराष्ट्रमंत्र्यांची टीका

S. Jaishankar on Canada : जगातिक समीकरणं बदलत आहेत. आता गैर पश्चिमी देशाचा बोलबाला आहे. कॅनडाला हे स्वीकार करण्यास वेळ लागत आहे, असं परराष्ट्रमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

जाहिरात
Read Time: 2 mins
भारत आणि कॅनडामधील सध्याच्या परिस्थितीचं केंद्रीय परराष्ट्र मंत्र्यांनी विश्लेषण केलं.
नवी दिल्ली:

एनडीटीवी वर्ल्ड समिट 2024 - 'द इंडिया सेंचुरी' (NDTV World Summit 2024 - The India Century)  या खास कार्यक्रमाला सोमवारी सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी यावेळी NDTV वर्ल्ड हे नवं चॅनेल लाँच केलं. जगभरात सुरु असलेल्या उलथापालथीमध्ये भारत हा आशेचा किरण बनला आहे, असं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं. केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर देखील या कार्यक्रमात सहभागी झाले. त्यांनी जगभराताली प्रश्नावर भारताची भूमिका स्पष्ट केली. एनडीटीव्ही नेटवर्कचे मुख्य संपादक संजय पुगलिया यांनी जयशंकर यांची मुलाखत घेतली.

कॅनडाच्या मुद्यावर काय म्हणाले परराष्ट्रमंत्री?

भारत आणि कॅनडामधील सध्याच्या परिस्थितीचं केंद्रीय परराष्ट्र मंत्र्यांनी विश्लेषण केलं.. कॅनडाशी भारताचे संबंध चांगले होते. त्यामुळे आज जे संबंध निर्माण झालेत त्यावर अनेकांना आजही विश्वास बसत नाही. भारत आता पुढं वाटचाल करत आहे. कॅनडाचा मुद्दा हा एक पश्चिमी मुद्दा आणि कॅनडामधील परिस्थितीशी निगडित आहे. जगातिक समीकरणं बदलत आहेत. आता गैर पश्चिमी देशाचा बोलबाला आहे. कॅनडाला हे स्वीकार करण्यास वेळ लागत आहे, जगातील शक्तीचं संतुलन बदलत आहे. पाश्चिमात्य देशांना हे समजायला वेळ लागेल, असं त्यांनी स्पष्ट केलं. 

( नक्की वाचा : NDTV World Summit : भारताच्या प्रगतीचा जगाला फायदा, PM मोदींनी मांडलं नव्या भारताचं व्हिजन )

उच्चायुक्तालयातील अधिकारी, राजकारणी यांना जाहीरपणे धमक्या दिल्या गेल्या.  त्याबद्दल कॅनडाला जाब विचारला असता ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्याचे म्हणतात. भारतीय उच्चायुक्तालयातील दूतांना धमकी दिली की ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य असते, मात्र भारतातील पत्रकारांनी 'कॅनडाचे उच्चायुक्त पराष्ट्र मंत्रालयातून तणतणत बाहेर पडले' असे वृत्त दिले तर तो परदेशी व्यक्तींचा हस्तक्षेप आहे असे कॅनडा म्हणते. दुटप्पीपणा हा याबाबत सामान्य शब्द आहे, असं परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितलं. 

Advertisement

क्वाडची निर्मिती 2017 साली झाली होती. अमेरिका बदलली आहे. भारतासोबत सहकार्याचे महत्त्व अनेक देशांना कळाले आहे. दुर्दैवाने हे कॅनडाला कळाले नाही.