जाहिरात

Silicon Valley : चिनी गुप्तहेरांकडून 'सेक्स वॉरफेअर'चे अस्त्र, सिलिकॉन व्हॅलीत हेरगिरीचा नवा 'मास्टर प्लॅन'

Silicon Valley: तंत्रज्ञानाच्या जगात सर्वात मोठे केंद्र असलेल्या अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली मध्ये एक नवी आणि धक्कादायक प्रकारची हेरगिरी सुरू आहे.

Silicon Valley : चिनी गुप्तहेरांकडून 'सेक्स वॉरफेअर'चे अस्त्र, सिलिकॉन व्हॅलीत हेरगिरीचा नवा 'मास्टर प्लॅन'
Silicon Valley : या गुप्तहेरांना तुम्ही 'जेम्स बाँड' (James Bond) चित्रपटातील नायकांसारखे समजू शकता... (प्रतिकात्मक फोटो)
मुंबई:

Silicon Valley: तंत्रज्ञानाच्या जगात सर्वात मोठे केंद्र असलेल्या अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली मध्ये एक नवी आणि धक्कादायक प्रकारची हेरगिरी सुरू आहे. याला इंटेलिजन्स तज्ज्ञांनी 'सेक्स वॉरफेअर' (Sex Warfare) असे नाव दिले आहे. थोडक्यात, परदेशातील गुप्तहेर संस्था, विशेषतः चीन आणि रशियाचे (China and Russia) गुप्तहेर, आता अमेरिकन टेक कंपन्यांमधील महत्त्वाच्या कर्मचाऱ्यांशी 'प्रेमसंबंध' जोडून किंवा लग्न करून देशाचे आणि कंपन्यांचे तंत्रज्ञान रहस्य (Tech Secrets) चोरत आहेत.

प्रेम नाही, तर...

या गुप्तहेरांना तुम्ही 'जेम्स बाँड' (James Bond) चित्रपटातील नायकांसारखे समजू शकता, पण त्यांचे काम अधिक धोकादायक आहे. यामध्ये अतिशय आकर्षक आणि हुशार दिसणाऱ्या महिलांना गुप्तहेर म्हणून प्रशिक्षण दिले जाते. या महिला मोठ्या टेक कंपन्यांमधील किंवा सरकारी प्रकल्पांवर काम करणाऱ्या महत्त्वाच्या कर्मचाऱ्यांशी ओळख वाढवतात.

या महिला सुरुवातीला कामात किंवा आवडींमध्ये रुची दाखवतात, जिव्हाळ्याचे संबंध निर्माण करतात. अनेकदा लग्न करून कुटुंबही तयार करतात, जेणेकरून त्या व्यक्तीच्या आयुष्यात कायम राहून दीर्घकाळ माहिती चोरता येईल.

( नक्की वाचा : Bira 91 : फक्त एक शब्द काढला आणि बिअर ब्रँड अडचणीत; 748 कोटींचं नुकसान... वाचा काय घडलं? )
 

 या प्रेमसंबंधांचा किंवा लग्नाचा उद्देश 'प्रेम' नसून, अमेरिकेच्या टेक्नॉलॉजी कंपन्यांमधील गुपित माहिती (Secret Data) आणि नवीन शोध (New Discoveries) चोरून आपल्या देशाला देणे हा असतो.

एका कर्मचाऱ्याने एका परिषदेत भेटलेल्या महिलेबद्दल सांगितले. ती खूप हुशार आणि उत्साही वाटली. मात्र, अनेक वर्षांनंतर त्याला कळले की, ती एक सुनियोजित हेरगिरीच्या ऑपरेशनचा भाग होती, जी केवळ अमेरिकेचे रहस्य चोरण्यासाठी तयार केली गेली होती.

'लिंक्डइन' आणि 'कॉन्फरन्स'वरही धोका

जेम्स मुलवेनॉन (James Mulvenon) हे अमेरिकेच्या कंपन्यांना चीनमधील गुंतवणुकीबद्दल सल्ला देतात. त्यांनी सांगितले की, आकर्षक चिनी महिलांकडून त्यांना 'लिंक्डइन' (LinkedIn) वर मोठ्या प्रमाणात फ्रेंड रिक्वेस्ट्स (Friend Requests) येत आहेत आणि हा प्रकार अलीकडे खूप वाढला आहे.

उदाहरणार्थ  एका परिषदेत (Conference), जेथे चीनसोबतच्या गुंतवणुकीच्या धोक्यांवर चर्चा होणार होती, तिथे दोन आकर्षक चिनी महिलांनी आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडे कार्यक्रमाची संपूर्ण माहिती होती, पण त्यांना प्रवेश मिळाला नाही.

( नक्की वाचा : Pak-Afghan Conflict : पाकिस्तानचा 'काळ' अफगाणिस्तानात! 'या' दहशतवादी नेत्यामुळेच सुरु झाले दोन्ही देशात युद्ध )
 

तंत्रज्ञानच नाही, राजकीय माहितीही धोक्यात

या हेरगिरीमुळे अमेरिकेचे दरवर्षी सुमारे 600 अब्ज अमेरिकन डॉलर्स पर्यंतचे आर्थिक नुकसान (Economic Loss) होते, अशी धक्कादायक माहिती उघड झाली आहे. हे पैसे बौद्धिक संपदा चोरीमुळे (Intellectual Property Theft) गमावले जातात. चीन आता केवळ 'लव्ह ट्रॅप' (Love Trap) नव्हे, तर 'स्टार्टअप स्पर्धा' (Startup Competitions) आयोजित करून किंवा अमेरिकन कंपन्यांमध्ये पैसे गुंतवून त्यांच्या व्यवसाय योजना (Business Plans) चोरत आहे.

आता केवळ प्रशिक्षित गुप्तहेरच नव्हे, तर सामान्य नागरिक, विद्यार्थी, गुंतवणूकदार आणि क्रिप्टो (Crypto) विश्लेषक अशा लोकांनाही हेरगिरीसाठी वापरले जात आहे, ज्यामुळे त्यांना ओळखणे खूप कठीण झाले आहे.

राजकीय घडामोडींवर प्रभाव

सिलिकॉन व्हॅलीमध्ये राजकीय हेरगिरीही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. परदेशी गुप्तचर युनिट्स (Intelligence Units) स्थानिक नेते आणि राजकारण्यांना भरती करून त्यांच्या माध्यमातून महत्त्वाच्या राजकीय घडामोडींवर प्रभाव टाकत आहेत. 

सिलिकॉन व्हॅली हे अमेरिकेचे एक 'ओपन कल्चर' (Open Culture) असलेले ठिकाण आहे, जिथे बाहेरच्या लोकांना सहज प्रवेश मिळतो. याच कारणामुळे या क्षेत्राला आता 'गुप्तहेरगिरीचे रणांगण' (Wild West of Espionage) म्हंटले जात आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com