सौर वादळ पृथ्वीला धडकल्याची घटना शनिवारी घडली आहे. ज्यामुळे युरोपपासून दक्षिण अमेरिकेच्या अलबामापर्यंत आकाशात रंगीबेरंगी रोषणाई दिसत होती. अत्यंत सुंदर आणि आकर्षक असा हा नजारा होता. मात्र या सौर वादळाचे दुष्परिणाम देखील तितकेच जास्त आहेत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, आकाशात दिसणाऱ्या अशा दृष्यांना अरोरा (Aurora) किंवा नार्दर्न लाईट्स (Northen Lights) असंही म्हटलं जात. मात्र या खगोलीय घटनेमुळे वीज पुरवठा खंडीत होणे आणि सॅटलाईट नेव्हिगेशन सिस्टम बाधित होण्याचाही धोका आहे. पृथ्वीला धडकणारी सूर्याची उर्जा 5 स्तरांमध्ये आहे.
अमेरिकेच्या स्पेस वेदर डिपार्टमेंटने याबाबत सांगितलं की, संध्याकाळी 6.54 वाजता पृथ्वीच्या चुंबकीय कक्षेला सूर्याची ही उर्जा धडकली आहे. ज्यामुळे एक भू-चुंबकीय वादळ तयार झालं आहे.
(नक्की वाचा- चारधाम यात्रेचं 2 दिवसात कोसळलं नियोजन, हा Video आहे गंभीर इशारा)
ऑक्टोबर 2023 साली देखील असंच एक वादळ आलं होतं. ज्यामुळे स्वीडनमधील वीज पुरवठा खंडीत झाला होता. तसेच दक्षिण आफ्रिकेतील अनेक ट्रान्सफार्मर खराब झाले होते. या सौर वादळामुळे पावर ग्रीड आणि सॅटलाईन फेल होऊ शकतात. ज्याचा फटका अवघ्या देशाला बसू शकतो. जगभरातील नेव्हिगेशन सिस्टममध्ये बिघाड होऊ शकतो.
( नक्की वाचा : देशात हिंदूच्या लोकसंख्येत घट, मुसलमानांची लोकसंख्या 43 टक्के वाढली )
इलॉन मस्क यांनी देखील याबाबत ट्वीट करत म्हटलं की, सौर वादळामुळे SpaceX च्या सॅटलाईटवर प्रचंड दबाव आहे.
Major geomagnetic solar storm happening right now. Biggest in a long time. Starlink satellites are under a lot of pressure, but holding up so far. pic.twitter.com/TrEv5Acli2
— Elon Musk (@elonmusk) May 11, 2024
युरोप, आशिया आणि उत्तर अमेरिकेतील पृथ्वीच्या ध्रुवांजवळून जाणाऱ्या उड्डाणांचा मार्ग बदलण्यात येणार आहे. ज्यामुळे विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा रेडिएशनपासून बचाव केला जाऊ शकतो. सौर वादळाचा प्रभाव जवळपास 12 तास राहू शकतो, असा अंदाज आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world