जाहिरात

Spacex-NASA ISS Mission : अखेर 9 महिन्यांनंतर सुनीता विल्यम्सची 'वापसी'; पृथ्वीवर कधीपर्यंत येतील?

सुनीता विल्यम्स पृथ्वीवर कधीपर्यंत येतील, कसा असेल परतीचा प्रवास?

Spacex-NASA ISS Mission : अखेर 9 महिन्यांनंतर सुनीता विल्यम्सची 'वापसी'; पृथ्वीवर कधीपर्यंत येतील?

Sunita Williams : भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्सचा पृथ्वीवर सुरक्षित परत येण्याचा प्रवास सुरू झाला आहे. सुनीता यांच्यासह त्यांचे सहकारी बुच विल्मोरदेखील तब्बल नऊ महिन्यांनी पृथ्वीवर परतणार आहे. दोघांना सुखरुप आणण्यासाठी अमेरिकन अंतराळ यान रवाना झालं आहे. यापूर्वी नासाने दिलेल्या माहितीनुसार, दोघेही 19 मार्चपूर्वी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनवरुन रवाना होतील. नासा-स्पेसएक्स क्रू-10 अमेरिकेन वेळेनुसार 14 मार्चच्या सायंकाळी 7.03 वाजता लॉन्च करण्यात आलं. यशस्वी प्रेक्षपणानंतर सुनीता विल्यम्स आणि विल्मोर लवकरच पृथ्वीवर परततील.  खरंतरं त्यांचं मिशन फक्त आठ दिवसांचं होतं. पण त्यांना घेऊन जाणाऱ्या बोईंगच्या स्टारलायनर या यानात तांत्रिक बिघाड झाला आणि सुनिता विल्मस आणि बच विल्मोर यांचा पृथ्वीकडे येण्याचा प्रवास रखडला. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अंतराळवीरांचा आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात राहण्याचा काळ आणि तिथे त्यांनी करायचं काम हे आधीच ठरलेलं असतं. ठराविक वेळेत अंतराळवीर आपलं संशोधन करुन परत येतात. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात ज्या यानाने ते गेले त्याच यानाने त्यांनी पृथ्वीवर परत येणं अपेक्षित असतं. अनेकदा अंतराळातील प्रयोग दीर्घकालीन असतात. अशावेळी अतराळवीरांना घेऊन गेलेलं यान पृथ्वीवर येतं. या यानाची योग्य ती डागडुजी करुन अवकाशातील अंतराळवीरांना रिप्लेस करण्यासाठी काही अंतराळवीर स्पेस स्टेशनवर जातात. अवकाशात असणारे अंतराळवीर त्यांच्या प्रयोगाच्या विद्यमान स्थितीची माहिती नव्यानं आलेल्या अंतराळवीरांना देतात आणि नव्या अंतराळवीरांना घेऊन आलेल्या यानातून परत पृथ्वीवर येतात.

Donald Trump : 'ते एकमेकांवर प्रेमही करत असतील, तिचे केस...'  सुनीता विल्यम्सबद्दल ट्रम्प भलतंच बोलले!

नक्की वाचा - Donald Trump : 'ते एकमेकांवर प्रेमही करत असतील, तिचे केस...' सुनीता विल्यम्सबद्दल ट्रम्प भलतंच बोलले!

गुरुवारी तांत्रिक कारणामुळे प्रक्षेपण रद्द..
अंतराळ प्रवासी सुनीता विल्यम्स याचं गुरुवारी आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवरुन परतीचा प्रवास सुरू होणार होता. मात्र काही तांत्रिक गोष्टींमुळे गुरुवारचं प्रक्षेपण रद्द करण्यात आलं. 

सुनीत विल्यम्स कोणत्या मिशनसाठी गेल्या होत्या?
नासाच्या बोईंग क्रू फ्लाइट टेस्ट मिशन 5 जून 2024 रोजी लाँच करण्यात आलं होतं. या मोहिमेअंतर्गत नासाने आपल्या दोन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बॅरी बुच विल्मोर यांना आठ दिवसांच्या अंतराळ प्रवासावर पाठवलं होतं. या दोघांना स्टारलाइनर अंतराळ यानाद्वारे मोहिमेवर पाठवण्यात आलं होतं. अंतराळवीरांसह इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (ISS) साठी स्टारलायनर अंतराळ यानाचं हे पहिलं उड्डाण होतं. सुनीता आणि बॅरी ज्या मिशनवर आहेत ते नासाच्या कमर्शियल क्रू प्रोग्रामचा एक भाग आहे. अमेरिकन खाजगी उद्योगाच्या भागीदारीत अमेरिकेतून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकापर्यंत  सुरक्षित, विश्वासार्ह आणि कमी किमतीत मानव मिशन पाठवणं हे नासाचं ध्येय आहे. याच उद्देशाने ही टेस्ट मोहीम सुरू करण्यात आली आहे.