इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिका युद्धामुळे बंद करण्यात आलेल्या जगातील सर्वात महत्त्वाच्या तेल मार्गावर आता हालचाली सुरू झाल्या आहेत. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी गुरुवारी जाहीर केले की, भारत हा इराणच्या 5 प्रमुख मित्र देशांपैकी एक असून, भारतीय जहाजांना स्ट्रेट ऑफ होर्मुजमधून सुरक्षित जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.
स्ट्रेट ऑफ होर्मुज जगाची 'लाईफलाईन'
जागतिक तेल पुरवठ्याचा सुमारे 20% हिस्सा या 33-39 किमी रुंद मार्गावरून जातो. युद्ध सुरू झाल्यापासून इराणने हा मार्ग जवळपास बंद केला होता, ज्यामुळे भारतासह अनेक देशांची इंधन सुरक्षा धोक्यात आली होती. मात्र इराणने आता भारत, रशिया, चीन, इराक आणि पाकिस्तान यांना या मार्गावरून जहाज वाहतुकीसाठी परवानगी दिली आहे.
इराणच्या अटी
इराणने स्पष्ट केले आहे की, केवळ त्याच जहाजांना परवानगी दिली जाईल जी "गैर-शत्रुतापूर्ण" आहेत. म्हणजे त्या देशाची जहाजे इराणविरुद्धच्या कोणत्याही लष्करी कारवाईत सहभागी नसावीत. त्यांनी इराणने जाहीर केलेल्या सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे. इराणच्या सक्षम अधिकाऱ्यांशी योग्य ताळमेळ राखावा.
(नक्की वाचा- Kolhapur News: कोल्हापुरात पेट्रोल-डिझेलसाठी नवे नियम! इंधन खरेदीवर 31 मार्चपर्यंत मर्यादा)
भारत सरकारची भूमिका आणि 'सर्वपक्षीय' बैठक
भारत सरकारने बुधवारी मध्यपूर्व संकटावर सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत मिळालेली माहिती अशी आहे की, पेट्रोलियम उत्पादने घेऊन येणारी भारताची 4 जहाजे आधीच होर्मुज पार करून आली आहेत. तर 5 जहाजे लवकरच पार करतील. अद्यापही भारताची 18 जहाजे होर्मुजच्या आसपास अडकून पडली आहेत.
(नक्की वाचा- RCB Name Change: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाचं नाव बदलणार? नव्या मालकांनी काय सांगितलं?)
संयुक्त राष्ट्राचा हस्तक्षेप
संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी इराणला हा महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय जलमार्ग खुला करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनानंतरच इराणने मित्र देशांसाठी सवलत जाहीर केली आहे.