जाहिरात

Ferrari Fire: 10 वर्ष पैसे साठवून फेरारी घेतली, तासाभरात 2 कोटींच्या कारची राख झाली, नेमकं घडलं काय?

Ferrari Car burn: या माणसाने 10 वर्षे प्रत्येक रुपया वाचवला आणि स्वतःसाठी एक नवीन फेरारी 458 स्पायडर कार खरेदी केली, त्यानंतर ती जळून राख झाली.

Ferrari Fire: 10 वर्ष पैसे साठवून फेरारी घेतली, तासाभरात 2 कोटींच्या कारची राख झाली, नेमकं घडलं काय?

जपान: स्वतःची कार असावी असं प्रत्येकाचे स्वप्न असते. पै पै गोळा करुन काहीजण आपली ड्रीम कार खरेदी करतात.. मात्र अनेकदा नव्याकोऱ्या कारचाच भीषण अपघात झाल्याची मोठी दुर्घटना घडल्याचे ऐकायला मिळते. जपानमधून अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे ज्याची  या दुर्घटनेत नव्या कोऱ्या कारची जळून राख झाली. नेमकं काय झालं? जाणून घ्या सविस्तर...

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की,  जेव्हा तुम्ही गाडी खरेदी करण्यासाठी फक्त थोडीशी रक्कमच नाही तर 10 वर्षांसाठी बचत करता आणि ती गाडी मिळाल्यानंतर ती जळून राख होते, तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय असेल याचा विचार करा? खरंतर, जपानमधील एका संगीत निर्मात्यासोबतही असेच काहीसे घडले आहे. रिपोर्ट्सनुसार, या माणसाने 10 वर्षे प्रत्येक रुपया वाचवला आणि स्वतःसाठी एक नवीन फेरारी 458 स्पायडर कार खरेदी केली, त्यानंतर ती जळून राख झाली.

या जपानी माणसाला त्याची फेरारी मिळाल्याच्या अवघ्या एक तासानंतर, त्याच्या इंजिनला अचानक आग लागली आणि ते जळून राख झाले. द सनच्या अहवालात म्हटले आहे की संगीत निर्माता होनकॉन यांनी सुमारे 10 वर्षे बचत केली आणि 43 दशलक्ष जपानी येन म्हणजेच सुमारे 26 कोटी रुपये किमतीची फेरारी 458 स्पायडर कार खरेदी केली. जेव्हा होनकॉनला या कारची डिलिव्हरी मिळाली, तेव्हा तो लगेच टोकियोच्या रस्त्यांवर गाडी चालवायला गेला.

ट्रेंडिग बातमी - Pahalgam attack: भारताने पाकिस्तानवर हल्ला केला तर जगाचा पाठिंबा कुणाला? अमेरिका, रशिया, चीन कुणाच्या बाजूनं?

टोकियोच्या रस्त्यांवरून फेरारी गाडी जात असताना, गाडी कुठेही आदळली नसली तरी इंजिनमधून धूर येऊ लागला. होनकॉन ताबडतोब गाडीतून बाहेर पडला आणि काही वेळातच गाडीने पेट घेतला. ही संपूर्ण घटना टोकियोच्या मिनाटो परिसरातील एक्सप्रेसवेवर घडली. या घटनेत फेरारी स्पायडर 20 मिनिटांत जळून राख झाली.

या संपूर्ण घटनेनंतर होनकॉनने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर सर्व तपशील शेअर केले आणि सांगितले की मी कार खरेदी करताच अवघ्या एका तासात ती जळून राख झाली. मला वाटते की संपूर्ण देशात (जपानमध्ये) मी एकमेव व्यक्ती आहे जो या समस्येचा सामना कोणी केला आहे. मला खूप भीती वाटते कारण या गाडीचा स्फोट होऊ शकला असता.

ट्रेंडिंग बातमी - Exclusive: देश सुरक्षित हातात, मग अशा घटना का होतात? वीर योद्धे नायक दीपचंद यांचा क्रोध

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: