
जेव्हा फरारी कारचे नाव समोर येते, तेव्हा डोळ्यासमोर वेग, आलिशानपणा आणि सुपरकार्सची प्रतिमा उभी राहते. ही केवळ एक गाडी नाही, तर अनेकांचे स्वप्न आणि स्टेटस सिम्बॉल आहे. फरारीचा उल्लेख होताच, अनेकदा एक प्रश्न मनात येतो की, ही इतकी शक्तिशाली कार मायलेजच्या बाबतीत कशी आहे? ती रोजच्या वापरासाठी योग्य आहे की, फक्त एक हौस म्हणून तिची निवड केली जाते? जर तुमच्या मनातही हाच प्रश्न असेल की फरारी कार एक लीटरमध्ये किती किलोमीटरचा प्रवास करते, तर याचे उत्तर सोप्या भाषेत समजून घेऊयात.
फरारीचे मॉडेल आणि मायलेज
Ferrari 812 Superfast: फरारीच्या हाय-परफॉर्मन्स मॉडेलपैकी एक असलेल्या या कारमध्ये V12 शक्तिशाली इंजिन आहे. शहरात हे मॉडेल सुमारे 5.5 kmpl आणि हायवेवर 6.2 kmpl चे मायलेज देते. येथे बचतीपेक्षा वेगाला प्राधान्य दिले जाते.
Ferrari 488 GTB: V8 इंजिन असलेल्या या मॉडेलचे मायलेज 812 पेक्षा थोडे चांगले आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, ही कार 8 kmpl चा एवरेज देऊ शकते. मात्र, हे मायलेज चालवण्याच्या पद्धतीवर आणि रस्त्यांच्या स्थितीवर अवलंबून असते.
Ferrari Portofino: फरारीच्या लाइनअपमध्ये सर्वाधिक मायलेज देणाऱ्या कारमध्ये पोर्टोफिनोचे नाव आघाडीवर आहे. ARAI च्या टेस्टिंगनुसार, ही कार 10 kmpl पर्यंत मायलेज देते. फरारीच्या मानकांनुसार, तिला “मायलेज किंग” म्हटले जाते.
नक्की वाचा - मोटोरोलाचा Edge 60 PRO मिळणार फक्त 2_ _ _9 रुपयांना, किंमत अचूक ओळखली असेलच
फरारीसारखी सुपरकार लोक मायलेजसाठी खरेदी करत नाहीत. तर तिच्या उच्च कार्यक्षमतेसाठी, शक्तिशाली इंजिनसाठी आणि वेगासाठी निवडतात. या गाड्यांचे मायलेज 5 ते 10 kmpl च्या दरम्यान असते. पण त्यांच्यासाठी हा कधीच चिंतेचा विषय नसतो. त्यांच्यासाठी फरारीचा अनुभव आणि वेग महत्त्वाचा असतो. ज्यामुळे ही कार इतरांपेक्षा वेगळी ठरते. त्यामुळे फरारीच्या बाबतीत 'किती मायलेज देते?' हा प्रश्न मागे पडतो आणि 'किती वेगवान धावते?' हा प्रश्न समोर येतो.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world