Military Helicopters Accident: मलेशियामध्ये नौदलाच्या तळाजवळ मोठा अपघात झाला आहे. ट्रेनिंगदरम्यान नौदलाचे हेलिकॉप्टर कोसळल्याने (Malaysia Helicopter Crash) 10 जणांचा मृत्यू झाला आहे. दोन हेलिकॉप्टरची धडक झाल्याने ही भीषण दुर्घटना घडली. मलेशियातील लुमुट नौदल तळाजवळ नौदलाच्या सरावादरम्यान हा अपघात झाला आहे.
(नक्की वाचा: MDH-एव्हरेस्ट मसाला कंपन्यांच्या अडचणीत वाढ, सिंगापूरनंतर येथेही विक्रीवर बंदी)
In a statement, the Royal Malaysian Navy said that its two helicopters collided in mid-air during a rehearsal for a naval parade today, killing all 10 crew members aboard, reports Reuters.
— ANI (@ANI) April 23, 2024
नौदलाने एका निवेदनात म्हटले आहे की, रॉयल मलेशियन नेव्ही परेडचा मंगळवारी (23 एप्रिल) सराव सुरू होता. यावेळेसच दोन हेलिकॉप्टर्सची हवेमध्ये धडक झाली. अपघाताच्या वेळेस हेलिकॉप्टरमध्ये 10 क्रू मेंबर्स उपस्थित होते. दुर्घटनेत या दहा जणांचा जागीच मृत्यू झाला. पश्चिमेकडील पेराक राज्यातील लुमुट नौदल तळाजवळ मंगळवारी सकाळी 9.32 वाजता ही घटना घडल्याचे म्हटले जात आहे.
(नक्की वाचा: 'मी तेव्हा 8 आठवड्यांची प्रेग्नेंट होते...' चुकीच्या आरोपाखाली तुरुंगवास भोगणाऱ्या महिलेने फेटाळला बॉसचा माफीनामा)
At least 10 people k1lled when two military helicopters collided midair in Lumut, #Malaysia. pic.twitter.com/gR45qrwjVZ
— Arthur Morgan (@ArthurM40330824) April 23, 2024
नौदलाने दिलेल्या माहितीनुसार, 10 क्रू मेंबर्सचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांची ओळख पटवण्यासाठी लुमुट आर्मी बेस हॉस्पिटलमध्ये मृतदेह पाठवण्यात आले आहेत.
(नक्की वाचा: बापरे! या ज्वालामुखीतून बाहेर येतंय लाखोंचं सोनं, कुठे आहे ठिकाण?)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world