एक व्यक्ती त्याच्या जीवनातील तब्बल 50 वर्षांहून अधिक काळ हॉस्पिटलमध्येच राहत होता. यामागील कारण समजल्यानंतर जगभरातील लोक आश्चर्यचकित झाले आहेत. गंभीर आजार नसताना देखील युनायडेट किंगडमचा चार्ल्स एस्लर यांना 50 वर्षांहून अधिक काळ हॉस्पिटलमधील एका बंद खोलीमध्ये राहण्याची वेळ आली. वयाच्या दहाव्या वर्षी चार्ल्स यांची शिकण्याची क्षमता कमी असल्याने आणि अपस्माराच्या समस्येमुळे (फिट येण्याची समस्या) त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
वयाच्या 62व्या वर्षी हॉस्पिटलमधून सुटका
याबाबत चार्ल्स एस्लर यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले की, हॉस्पिटलमध्ये कित्येक वाढदिवस साजरे केले आहेत आणि मला कैदेत राहणे मुळीच आवडत नव्हते. त्यांची बहीण मार्गोने या प्रकरणाबाबत सांगितलेली माहिती भावुक करणारी होती. मार्गो म्हणाल्या की, एस्लर यांना हॉस्पिटलबाहेर आणण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागले. गेल्या वर्षी म्हणजे वयाच्या 62व्या वर्षी चार्ल्स एस्लर यांना पहिल्यांदाच स्वतःच्या घराच्या चाव्या मिळाल्या.
रिचमंड फेलोशिप स्कॉटलंड (TRFS) या संस्थेतील डेव्हिड फ्लेमिंग यांनी म्हटले की, चार्ल्स यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्यासाठी योग्य जागा शोधण्यासाठी कित्येक वर्षे संघर्ष केला. दुर्दैवाने काही लोक यंत्रणेमध्ये अडकतात.
(नक्की वाचा: मोदींमुळे माझे लग्न मोडले! 4 बायका आणि 16 मुलांचा बाप असलेल्या मौलवीने सांगितले आपले दु:ख)
रुग्णांना घरी पाठवण्याचे दशकांपूर्वीचे अधिकृत धोरण
रिपोर्ट्सनुसार, शिकण्याची क्षमता नसलेले शेकडो लोक अजूनही रुग्णालयांपुरतेच मर्यादित आहेत. हे सर्वजण आपल्या कुटुंबीयांपासून शेकडो मैल दूर अंतरावर राहतात. अशा प्रकारच्या सर्व रूग्णांना दीर्घकाळ देखभाल करणाऱ्या संस्थांऐवजी स्वतःच्याच घरामध्येच ठेवावे, असे अधिकृत धोरणांमध्ये नमूद करण्यात आले आहे.
(नक्की वाचा: अबब! कारमध्ये शिरला 6 फुट लांब महाकाय अजगर, ड्रायव्हरला फुटला घाम VIRAL VIDEO)
"...मला स्वातंत्र्य मिळत नव्हते"
चार्ल्स एस्लर यांनी सांगितले की, "मी आता बाहेर जाऊ शकतो. माझ्या अनेक आवडत्या ठिकाणी फिरू शकतो. रस्त्याशेजारी असणाऱ्या पबमध्ये जाऊ शकतो आणि तेथे जेवणाचा आस्वाद घेऊ शकतो. मला मासे-चिप्स खाणे आवडते. पूर्वी मला स्वातंत्र्य मिळत नव्हते. मला जेम्स बाँडचे सिनेमेही आवडतात. आता मी स्वयंपाक तयार करणे आणि घराची साफसफाई करणे शिकत आहे".
चार्ल्सची बहीण मार्गोचा संघर्ष
भावाला हक्काचे घर मिळवून देण्यासाठी अनेक वर्षे संघर्ष केला, असा दावा चार्ल्स यांची बहीण मार्गोने केला आहे.
याबाबत त्या म्हणाल्या आहेत की, "ही एखादी परीकथा आहे, असे समजू नका. एका रात्रीत पूर्ण होणारी ही प्रक्रिया नव्हेच. योग्य जागा शोधण्यासाठी आम्हाला तब्बल 14 वर्षांचा कालावधी लागला. या प्रक्रियेमध्ये बरेच लोक गुंतलेले आहेत".
स्कॉटलँड सरकारकडून पीडितांसाठी निधीची तरतूद
स्कॉटलँड सरकारने सांगितले की, शिकण्याची क्षमता कमी असणाऱ्या रुग्णांना त्यांच्या घरी पुन्हा पाठवण्यासाठी एकूण 20 दशलक्ष पाऊंड निधीची तरतूद केली आहे. तसेच रुग्णालयात दाखल असलेल्या किंवा घरापासून शेकडो मैल दूर असणाऱ्या पीडितांकरिता राष्ट्रीय नोंदणी तयार करण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांना सहकार्य देखील केले".
समाजकल्याण मंत्री मेरी टॉड यांनी सांगितले की, "परिस्थिती सुधारण्याकरिता प्रयत्न सुरू आहेत. आम्ही या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहोत, पण या प्रकरणावर समाधान शोधणे कठीण असल्याचे दिसत आहे. या प्रकरणाची कायदेशीर जबाबदारी स्थानिक अधिकाऱ्यांची आहे आणि मी त्यांच्यासोबत एकत्रितपणे काम करत आहे."
VIDEO: Kids Health बड्या कंपन्यांच्या हेल्थ ड्रींक मुलांसाठी घातक?
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world