रशिया आणि युक्रेनच्या युद्धादरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. रशियावर अमेरिकेच्या 9/11 सारखा हल्ला झाला आहे. हा हल्ला कोणी दहशतवाद्याने नाही तर युक्रेनने केला आहे. 9/11 च्या हल्ल्यात दोन विमानांनी इमारतीला धडक दिली होती. मात्र या हल्ल्यात एक ड्रोन उंच इमारतीला धडकलं आहे. रशियाच्या सेराटोवमध्ये सर्वात उंच इमारतीवर युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यामुळे शहरात दहशत पसरली आहे.
याशिवाय एंगेल्स शहरातही इमारतीला ड्रोनने धडक दिली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात चारजणं जखमी झाले आहेत. या भागाचे गव्हर्नर रोमन बुसारगिन यांनी सांगितलं की, 38 मजली बोल्गा स्काय आवासीय परिसरातील या इमारतीला निशाणा बनवण्यात आलं. या हल्ल्यात एक महिला गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेच्या व्हिडिओमध्ये इमारतीला एक ड्रोनने धडक दिल्याचं दिसत आहे.
नक्की वाचा - इस्त्रायलमध्ये आणीबाणीची घोषणा; हिज्बुल्लाहचा मोठा हल्ला, 300 हून अधिक क्षेपणास्त्र डागले
दोन शहरांमध्ये ड्रोन हल्ला...
गव्हर्नर बुसार्गिनच्या म्हणण्यानुसार, युक्रेनने लॉन्च केलेले ड्रोन रशियन संरक्षण यंत्रणेने रोखले होते. रशियाच्या साराटोव्ह प्रदेशातील दोन शहरांमध्ये घरांचं नुकसान झालं आहे. सेराटोव्हशिवाय एंगेल्समधील एका इमारतीलाही ड्रोन धडकलं आहे. व्होल्गा स्काय इमारतीला ड्रोनने धडक दिल्यानंतर इमारतीला एक मोठे भगदाड पडल्याचं दिसून येत आहे. रस्त्यावर सर्वत्र ढिगारा पसरला आहे. एंगेल्स येथील निवासी इमारतीच्या वरच्या मजल्याचंही नुकसान झालं आहे.