जाहिरात

इस्त्रायलमध्ये आणीबाणीची घोषणा; हिज्बुल्लाहचा मोठा हल्ला, 300 हून अधिक क्षेपणास्त्र डागले

हिजबुल्लाहने 300 हून अधिक क्षेपणास्त्र इस्त्रायलवर डागले आहेत.

इस्त्रायलमध्ये आणीबाणीची घोषणा; हिज्बुल्लाहचा मोठा हल्ला, 300 हून अधिक क्षेपणास्त्र डागले
नवी दिल्ली:

हिजबुल्लाहने इस्त्रायलवर हल्ला केला आहे. हिजबुल्लाहने 300 हून अधिक क्षेपणास्त्र इस्त्रायलवर डागले. इस्त्रायलच्या सैन्याने केलेल्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल हिजबुल्लाहने हा हल्ला केला आहे. 

हिजबुल्लाहच्या या हल्ल्यापासून लेबनॉनच्या सीमेला लागून असलेल्या इस्रायलच्या हद्दीत सायरनचे आवाज सतत ऐकू येत आहेत. या हल्ल्यानंतर इस्रायली लष्कराने संपूर्ण इस्रायलमध्ये आणीबाणी लागू केली आहे. तत्पूर्वी, रविवारी पहाटे इस्रायलने लेबनॉनच्या सीमेत घुसून हिजबुल्लाच्या ठाण्यांना लक्ष्य केले होते.

यापूर्वी इस्त्रायलचे लष्कर लेबनानमधील इराण समर्थनार्थ संघटना हिज्बुल्लाहच्या ठिकाणांवर हल्ला केला होता आणि तेथील 100 हून अधिक ठिकाणांवर निशाणा साधला होता. लेबनानच्या हवाई हल्ल्याचे उत्तर देताना हा हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर हिज्बुल्लाहने इस्त्रालवर मोठा हल्ला केला. यावेळी हिज्बुल्लाहने तब्बल 300 हून अधिक क्षेपणास्त्र डागल्याची माहिती आहे. 

नक्की वाचा - टेलिग्राम अ‍ॅपचे CEO पावेल ड्यूरोव यांना फ्रान्समधून अटक, रशिया-युक्रेन युद्धाशी कसा आहे संबंध?

परिणामी इस्त्रायचे संरक्षण मंत्री योव गॅलंट यांनी पुढील 48 तासांसाठी इस्त्रायलमध्ये आणीबाणी घोषित केली आहे. त्याशिवाय पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी या परिस्थितीला उत्तर देण्यासाठी उच्चस्तरित बैठक बोलावली. गेल्या अनेक महिन्यांपासून इस्त्रायल आणि हिज्बुल्लाहमधील तणाव वाढत होता. व्हाईट हाऊसचे राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रवक्ते सीन सॅवेट यांनी याबाबत सांगितलं की, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन हे इस्त्रायल आणि लेबनॉनमधील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com