जाहिरात

US-Israel-Iran War : मोबाइल बंद होणार, इंटरनेट सेवाही ठप्प होण्याची भीती; युद्ध अन् इंटरनेटचा काय आहे संबंध?

आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. तुमच्या हातातील मोबाइल आणि इंटरनेट सेवाही बंद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ज्यामुळे टेलिकॉम सेक्टरची झोप उडाली आहे. 

US-Israel-Iran War : मोबाइल बंद होणार, इंटरनेट सेवाही ठप्प होण्याची भीती; युद्ध अन् इंटरनेटचा काय आहे संबंध?

Impact of War on the Internet and Mobile Services : मध्य पूर्वेत इराण-इस्त्रायल-अमेरिकेच्या युद्धाच्या झळा आता जगभरात पाहायला मिळत आहे. या युद्धामुळे संपूर्ण जगाचं सप्लाय चेन विस्कळीत झालं आहे. परदेशात सुरू असलेल्या या युद्धाचा परिणाम तुमच्या घरातील गॅस, पेट्रोल-डिझेलवर तर होत आहेच. दरम्यान आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. तुमच्या हातातील मोबाइल आणि इंटरनेट सेवाही बंद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ज्यामुळे टेलिकॉम सेक्टरची झोप उडाली आहे. 

युद्धाचा आणि इंटरनेट सेवेचा काय आहे संबंध?

येत्या काळात देशातील मोबाइल कॉलिंग आणि इंटरनेट सेवेत अडथळा येऊ शकतो. डिजिटल इन्फास्ट्रक्चर प्रोव्हाइडर्स असोसिएशन म्हणजेच DIPA ने नागरिकांना अलर्ट केलं आहे. टेलिकॉम टॉवर तयार करणाऱ्या कंपन्यांना एलपीजी सप्लाय थांबविण्यात आली असून ज्यामुळे टॉवर उत्पादनावर मोठा परिणाम होऊ शकतो. 

याशिवाय ज्या समुद्री मार्गातून तेलाचे टँकर जातात, त्या समुद्राच्या खाली फायबर ऑप्टिक केबलचं नेटवर्क आहे. तज्ज्ञांनुसार, भारताच्या आंतरराष्ट्रीय इंटरनेट कनेक्टिविटीसाठी हे नेटवर्क अत्यंत महत्त्वाचं आहे. जर या क्षेत्रात काहीही अडचण आली तर याचा थेट परिणाम केवळ तेलावरच नाही तर भारतातील इंटरनेट, क्लाउड सर्व्हिस आणि ग्लोबल डेटा फ्लोवर होऊ शकतो. ट्रफिक सॅटेलाइटच्या माध्यमातून ग्लोबल इंटरनेट चालवलं जातं असं मानलं जातं. मात्र परिस्थिती वेगळी आहे. जगातील अधिकांश इंटरनेट डेटा समुद्राच्या आत पसरलेल्या फायबर ऑप्टिक केबलांच्या माध्यमातून ऑपरेट होतं. या केबल्समुळे ईमेल, आर्थिक व्यवहार, क्लाउड डेटा, व्हिडिओ कॉल आणि आंतरराष्ट्रीय डिजिटल संप्रेषण शक्य होतं.

स्टेट ऑफ हॉर्मुज आणि जवळील खाडीचा भाग आशिया, युरोप आणि मध्य पूर्वेला जोडणाऱ्या फायबर ऑप्टिक केबलांचा महत्त्वाचा ट्रान्जिट कॉरिडोर बनलं आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, या समुद्राच्या क्षेत्रात अनेक केबल प्रणाली कार्यरत आहेत. ज्यामुळे कोणत्याही जियो-पॉलिटिकल घटनेदरम्यान डिजिटल इन्फ्रास्टक्चरसाठी जोखीम वाढू शकते. 


भारतातील इंटरनेटसाठी हा मार्ग का आहे महत्त्वाचा? 

भारताची जागतिक इंटरनेट कनेक्टिव्हिटी मुख्यत्वे समुद्रातील केबल्सवर अवलंबून आहेत. ही केबल्स अरबी समुद्र आणि आखाती प्रदेशाद्वारे युरोप आणि इतर प्रदेशांशी जोडली जाते. याच कारणामुळे स्ट्रेट ऑफ हॉर्मुज भारतासाठी एक महत्त्वाच्या डिजिटल गेटवेची भूमिका निभावते. भारताच्या पश्चिमेकडे जाणारं इंटरनेट ट्रॅफिकचा साधारण एक तृतीयांश भाग याच समुद्र मार्गातून जातो. याच्या माध्यमातून अनेक महत्त्वाची डिजिटल सर्विस ऑपरेट होते. 

नक्की वाचा - Pune News : पुण्यातील बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी, दुकानांबाहेर मोठी झुंबड; वस्तुंसाठी तब्बल 8 दिवसांचं वेटिंग


समुद्राच्या आतमधील केबलांना नुकसान कसं होऊ शकतं? 

१ समुद्राच्या तळाशी असलेल्या केबलांना जहाजांचे नांगर, समुद्रातील दुर्घटना, नौसेनेच्या कारवाया किंवा पाण्याखाली होणाऱ्या स्फोटांमुळे नुकसान होऊ शकतं. एक केबल जरी तुटली तरीही मोठ्या प्रमाणात इंटरनेट ट्रॅफिकवर परिणाम होऊ शकतो. 

२ सामान्य परिस्थितीत खास जहाजांच्या माध्यमातून केबलची दुरुस्ती केली जाते. मात्र युद्ध सुरू असलेल्या क्षेत्रांमध्ये हे काम खूप कठीण असतं. सुरक्षेची जोखीम असल्याने दुरुस्ती प्रक्रिया लांबते. 

३ इंटरनेट ट्रॅफिक दुसऱ्या केबलांवर डायवर्ट केलं जाऊ शकतं. मात्र अनेकदा त्या मार्गांवर पुरेशी क्षमता नसते. अशा दुसऱ्या नेटवर्कवरही दबाव येऊ शकतो. 


  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com