जाहिरात

Alchohol Consumption Limit: 'एकच प्याला' नियम हद्दपार होणार, झिंगेपर्यंत पिता येणार?

दारूचे सेवन हे आरोग्यास हानीकारक ठरू शकते असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. दारू प्यायल्याने स्तनाच्या कर्करोगाची शक्यता बळावते.

Alchohol Consumption Limit: 'एकच प्याला' नियम हद्दपार होणार, झिंगेपर्यंत पिता येणार?
मुंबई:

अमेरिकेच्या नव्या आहार मार्गदर्शक तत्त्वांमध्ये (U.S. Dietary Guidelines) दारू पिण्यासंबंधीच्या शिफारशींमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. यापूर्वी दररोज एक किंवा दोन पेगची मर्यादा होती, आता ही शिफारस वगळण्यात येणार असून दारूप्रेमी झिंगून पडेपर्यंत पिऊ शकतील. सरकारने एकप्रकारे दारूनिर्मिती कंपन्यांना चिअर्स केले आहे. यामुळे दारूचा खप वाढेल आणि त्याचा दारू निर्मात्या कंपन्यांना फायदा होईल अशी आशा वर्तवण्यात येत आहे. 1-2 पेगच्या शिफारसींऐवजी आरोग्याला अपाय होणार नाही इतक्या प्रमाणातच दारू प्यावी अशी शिफारस करण्यात येण्याची शक्यता आहे .  1-2 पेगच्या शिफारसीमुळे दारूचा खप म्हणावा तितका वाढत नव्हता असा दावा केला जात आहे.  

नक्की वाचा : चपटीपासून खंब्यापर्यंत सगळं महागणार, दारूप्रेमींना महागाईची किक

नव्या शिफारसी कधी लागू होणार ?

अमेरिकन नागरिकांनी दारू पीत असताना ती ठराविक मर्यादेत प्यावी, आरोग्याचे धोके लक्षात घेऊन प्यावी अशी नवी शिफारस करण्यात येण्याची शक्यता आहे. नव्या शिफारसी या महिन्याच्या सुरुवातीलाच लागू होतील असे सांगितले जात आहे.  दारू पिण्यासंदर्भातील शिफारसी सुचवणाऱ्या मार्गदर्शक तत्वांमध्ये गरजेनुसार बदल करता येऊ शकतात असेही सांगितले जात आहे.  अमेरिकेच्या नागरिकांनी ज्यात महिला आणि पुरुष दोघांचा समावेश आहे 1-2 पेग रोज पिणे हे मध्यम स्वरुपाचे सेवन म्हणून मानले जाते. युकेसारख्या देशांमध्ये धडधाकट व्यक्तीने आठवड्याला 14 पेग दारू पिणे हे ठीक आहे असे सांगितले जाते. कॅनडामध्ये मात्र आठवड्याला 2 पेगपेक्षा जास्त दारू पिणे हे आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकते असे मार्गदर्शक तत्वात म्हटले आहे.  

दारू कंपन्यांमध्ये आनंदाचे वातावरण

दारूचे सेवन हे आरोग्यास हानीकारक ठरू शकते असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. दारू प्यायल्याने स्तनाच्या कर्करोगाची शक्यता बळावते. पक्षाघाताचा झटकाही येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे विविध देशांनी दारू किती प्यावी यासाठी मार्गदर्शक तत्वेच आखून दिली आहेत. अर्थात ही बंधनकारक नाही, मात्र निरोगी शरीरासाठी ही मार्गदर्शक तत्वे पाळली जावीत इतकी किमान अपेक्षा असते. अमेरिकेचे आरोग्यमंत्री रॉबर्ट एफ. केनेडी जूनियर, हे दारू पीत नाहीत, त्यामुळे दारू पिण्यासंदर्भातील मार्गदर्शक तत्वे ही कठोर असतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र घडले उलटेच 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com