जाहिरात

US VISA Policy: लठ्ठपणा, मधुमेह, हृदयरोग असल्यास अमेरिकेत नो एन्ट्री, ट्रम्प सरकारचा मोठा निर्णय

अमेरिका सरकार  लवकरच एक असा नवा व्हिसा नियम लागू करण्याच्या तयारीत आहे, ज्यामुळे जगभरात वादाची  ठिणगी पडली आहे.

US VISA Policy: लठ्ठपणा, मधुमेह, हृदयरोग असल्यास अमेरिकेत नो एन्ट्री, ट्रम्प सरकारचा मोठा निर्णय

US VISA Policy News: अमेरिका सरकार  लवकरच एक असा नवा व्हिसा नियम लागू करण्याच्या तयारीत आहे, ज्यामुळे जगभरात वादाची  ठिणगी पडली आहे. नवीन निर्देशानुसार, आता मधुमेह हृदयविकार स्थूलता आणि इतर जुनाट आजारांनी त्रस्त असलेल्या विदेशी नागरिकांना व्हिसा किंवा ग्रीन कार्ड  नाकारले जाऊ शकते. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने सर्व दूतावासांना आणि वाणिज्य दूतावासांना पाठवलेल्या निर्देशात म्हटले आहे की, व्हिसा अधिकारी आता केवळ संसर्गजन्य रोग आणि लसीकरण नोंदीच नाही, तर गैर-संसर्गजन्य  आजारांचा समावेशही व्हिसा मूल्यमापनात  करतील.

या नवीन मार्गदर्शक तत्त्वांमध्ये तपासणीसाठी समाविष्ट केलेल्या प्रमुख आजारांमध्ये हृदयविकार, मधुमेह, स्थूलता, न्यूरोलॉजिकल समस्या, मेटाबॉलिक विकार आणि काही मानसिक आरोग्य  स्थिती यांचा समावेश आहे.  या आजारांमुळे 'दीर्घकाळात लाखो हजार डॉलर्सच्या उपचारांची  मागणी होऊ शकते, असे दस्तऐवजात नमूद केले आहे. 

Bihar Election 2025: वाढलेली मतांच्या टक्केवारीनं कोणाला धडकी बसवली? वारं फिरणार की...

अर्जदार किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्याला कोणताही महागडा किंवा जुनाट आजार आहे का? त्यांच्याकडे उपचाराचा खर्च स्वतः उचलण्यासाठी आणि 'पब्लिक चार्ज'  म्हणजेच सरकारी मदतीवर अवलंबून न राहण्यासाठी पुरेसा आर्थिक आधार आहे का? त्यांच्या कुटुंबात अशी कोणतीही अपंगत्व किंवा आजार असलेली व्यक्ती आहे का, ज्यामुळे त्यांच्या रोजगाराच्या किंवा कमाईच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो? असे मुद्दे यामध्ये विचारात घेतले जाणार आहेत. 

नव्या नियमांचा परिणाम

जरी हा नियम तांत्रिकदृष्ट्या सर्व व्हिसा श्रेणींवर (पर्यटन, विद्यार्थी, व्यवसाय आणि स्थलांतरण) लागू होत असला तरी, याचा सर्वात मोठा परिणाम कायमस्वरूपी निवासआणि दीर्घकाळ व्हिसा अर्जदारांवर पडेल, असे तज्ञांचे मत आहे. यापूर्वीही आरोग्य तपासणी होत असे, पण आता त्याची व्याप्ती खूप वाढली आहे. आतापर्यंत अमेरिकेत केवळ संसर्गजन्य रोग, लसीकरण आणि काही आरोग्य समस्यांची तपासणी होत असे, पण आता व्हिसा अधिकारी अर्जदाराच्या भविष्यातील आरोग्य खर्चाचा आणि संभाव्य धोक्याचाही अंदाज घेतील।

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com