इस्लाममध्ये हिजाब हा महिलांच्या ड्रेस कोडचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. मात्र, अनेक देशांमध्ये हिजाबला विरोध होताना दिसत आहे. इराणच्या हिजाबला विरोध होताना दिसतोय. इराणमधील महिला अनेक दिवसांपासून हिजाब घालण्यास विरोध करत आहेत. मात्र इराणमध्ये महिलांना हिजाब घालणे अनिवार्य आहे. पण एका मुलीने हिजाबला विरोध करत रस्त्यावरच कपडे काढले.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
इराणच्या एका विद्यापीठाच्या आवारातील हा व्हिडिओ आहे, जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक तरुणी विद्यापीठाच्या भिंतीवर अर्धनग्न अवस्थेत बसलेली आहे. तरुणी काहीतरी मोठमोठ्याने बोलतानाही दिसत आहे. या व्हिडिओने इस्लामिक देशांसह जगभरात खळबळ उडवून दिली आहे.
(नक्की वाचा- दारुड्या नवऱ्याची रोजची कटकट; संतापलेल्या बायकोने कापलं गुप्तांग)
ऑनलाइन रिपोर्ट्सनुसार हा व्हिडिओ शनिवारचा (2 नोव्हेंबरचा) आहे. देशातील हिजाब सक्तीला विरोध करताना या तरुणीने सर्व मर्यादा ओलांडल्या. तरुणीला काही वेळातच पोलिसांनी ताब्यात घेतलं. मात्र व्हिडीओ वेगाने सोशल मीडियावर व्हायरल झाला. इराणमधील या विद्यापीठाचे प्रवक्ते अमीर महजोब यांनी सांगितलं की, पोलिसांनी मुलीची चौकशी केली असून, ती मानसिक दडपणाखाली आहे. इराणी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेला याबाबत कठोर शिक्षा करण्यात आली आहे. तिला मानसिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
(नक्की वाचा- पतीच्या मृत्यूनंतर रुग्णालय कर्मचाऱ्यांनी पत्नीकडून साफ करुन घेतला बेड; मध्य प्रदेशातील संतापजनक प्रकार)
मागील 2 वर्षांपासून हिजाबविरोधी आंदोलने
इराणमध्ये गेल्या 2 वर्षांपासून हिजाबला विरोध होत आहे. सप्टेंबर 2022 मध्ये अनेक महिलांनी हिजाबवर बहिष्कार टाकला होता. यावेळी पोलिसांनी महिलांना ताब्यात घेतले होते. या सर्वात एका महिलेचा मृत्यू झाला होता. हा विरोध दडपण्यासाठी पोलिसांनी कडक पावले उचलली, त्यात अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती देखील समोर आली होती.